अखेर मुख्यमंत्र्यांचं ठरलं : सरकारकडून आदेश जारी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ एप्रिल २०२१

अखेर मुख्यमंत्र्यांचं ठरलं : सरकारकडून आदेश जारी


महाराष्ट्रात उद्या रात्री ८ वाजल्यापासून आणखी कडक निर्बंध; सरकारकडून आदेश जारीउद्यापासून १ मेपर्यंत राज्यात निर्बंध अधिक कडक

ब्रेक दि चेन'अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

राज्यातील ऑफिसेसबाबत नवे नियम :
1. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट असेल.
2. इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार.
3. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार !

सामान्य लोकांच्या प्रवासावर पूर्णपणे बंदी

खासगी वाहतूक करणाऱ्यांना अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास करता येणार नाही. खासगी वाहतूक करणाऱ्यांनी जर नियम मोडले तर 10,000 रुपये दंड लावण्यात येणार आहे.

खासगी बसेस 50 टक्के क्षमतेने चालवल्या जाऊ शकतात.

एकाच हॅालमध्ये 2 तास कार्यक्रम होऊ शकतो

सकाळी 7 ते 11 भाज्या आणि किराणा मिळणार

लग्नासाठी आता संख्येचीच नव्हे तर वेळेचीही मर्यादा, नियम मोडल्यास 50 हजारांचा दंड
सरकारी कार्यालय 15 टक्के क्षमतेने सुरू राहतील.

मुंबईत लोकल पुन्हा अत्यावश्यक सेवा म्हणून चालवली जाणार