जितेंद्र बिडवई यांना महाराष्ट्र शासनाचा कृषिभूषण पुरस्कार जाहीर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०३ एप्रिल २०२१

जितेंद्र बिडवई यांना महाराष्ट्र शासनाचा कृषिभूषण पुरस्कार जाहीरजुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर तालुक्यातील गोळेगाव येथील प्रगतिशील शेतकरी जितेद्र चंद्रकांत बिडवई यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार २०१९ जाहीर झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी दिली. यापूर्वी त्यांना शासनाकडून वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे . बिडवई यांनी गोळेगाव येथे वीस वर्षांपूर्वी बळीराजा कृषी मंडळाची स्थापना करून कृषी मेळावे, कृषी प्रदर्शन , शेतकरी अभ्यास दौरा, द्राक्ष महोत्सव, शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री इत्यादी शेतीविषयक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत .त्याचप्रमाणे कीटकनाशकांचा सुरक्षित वापर हे अभियान राबवून शेतकऱ्यांना मोफत सुरक्षा किटचे वाटप देखील केले आहे.अनेक शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. डिसेंट फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम सुरू आहेत जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघाचे ते अध्यक्ष आहेत. तसेच कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील शास्त्रीय सल्लागार समितीचे सदस्य देखील आहेत. श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे सचिव म्हणून देखील कार्यरत आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.