१२० आजारांवरील शस्त्रक्रिया पुन्हा सुरु करा - आ. किशोर जोरगेवार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ एप्रिल २०२१

१२० आजारांवरील शस्त्रक्रिया पुन्हा सुरु करा - आ. किशोर जोरगेवार

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधून बंद करण्यात आल्या शस्त्रक्रिया 


आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेत सादर केले निवेदनमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधून १ एप्रिल २०२१ पासून बंद करण्यात आलेल्या १२० आजारांवरील शस्त्रक्रिया पून्हा सुरु करण्यात यावात अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असून सदर मागणी संदर्भात त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुंबई मंत्रालयात भेट घेत त्यांना निवेदन दिले आहे. ना. राजेश टोपे यांनीही याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन आ. जोरगेवार यांना दिले आहे.महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधून खाजगी रुग्णालयात होणार्या १२० आजारांवरील जीवनदायिनी शस्त्रक्रियाचे विमा संरक्षण १ एप्रिल २०२१ पासून काढून घेतले आहे. ह्या आजारांमध्ये हर्निया, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे काढणे, गर्भपिशवी काढणे ह्या सारख्या अनेक जीवघेण्या आजारांचा समावेश आहे . शासकीय रुग्णालयाच्या तुलनेत खाजगी रुग्णालयातील उपलब्ध सोयीसुविधेमध्ये बराच अंतर आहे. अनेकदा शासकीय रुग्णालयांमध्ये विशिष्ट आजारावर शस्त्रक्रियेची आवश्यकता भासल्यास त्या ठिकाणी सदर शस्त्रक्रिया करणारे तज्ञ डॉक्टर्स, सोयी व उपकरणे उपलब्ध नसतात. शासकीय रुग्णालयातील अश्या अनेक त्रुटींमुळे सामान्य नागरिक महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधून खाजगी रुग्णालयात नि:शुल्क शस्त्रक्रिया करून उपचार घेत होते. परंतु आता या योजनेतून १२० आजारांवरील शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्याने रुग्ण अडचणीत सापडला आहे.

आधीच कोरोना महामारीच्या काळात लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांना त्यांच्या जवळ उपलब्ध असलेला रोजगार गमवावा लागला आहे. तसेच कोरोना प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या आजारावर मात करण्याकरिता आर्थिकदृष्ट्या ताण पडलेला आहे. त्यामूळे सामान्य व गरीब जनतेला पडणार्या महागड्या शस्त्रक्रियाचा आर्थिक भुर्दंड व त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आजारावर योग्य उपचार मिळण्याकरिता सहानुभूतीपूर्वक विचार करून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधील रद्द करण्यात आलेल्या १२० आजारावरील जीवनदायी शस्त्रक्रियांना खाजगी रुग्णालयात पुन्हा विमा संरक्षण देत त्या सुरु करण्यात याव्हात असे या निवेदनाच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.