जनभावना लक्षात घेत चंद्रपूरातील व्यापारावर निर्बंध लावू नका - आ. किशोर जोरगेवार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०७ एप्रिल २०२१

जनभावना लक्षात घेत चंद्रपूरातील व्यापारावर निर्बंध लावू नका - आ. किशोर जोरगेवार


राज्याचे मुख्य सचिव व मुख्यमंत्री यांच्या सचिवांची भेट घेत केली मागणी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपायोजना करणे गरजेचे आहे. मात्र हे करत असतांना सर्वसामान्यांचाही विचार केला गेला पाहिजे. चंद्रपूरातील आस्थापणे बंद केल्यास याचा मोठा परिणाम व्यापारावर व पर्यायाने सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहे. अनेक कुटंुबांचा याच आस्थापणांच्या भरोश्यावर उदरनिर्वाह चालतो त्यामूळे जनभावना लक्षात घेत शती अटींवर कोरोना नियमांचे पालन करुन सदर सर्व आस्थानणे सुरु ठेवण्याची परवाणगी देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदनाच्या माध्यमातून केली होती. या बाबत आज मुबंई मंत्रालयात त्यांनी महाराष्ट्राचे मूख्य सचिव सिताराम कुंटे व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सचिव विकास खारगे यांची भेट घेत सदर मागणी बाबत सविस्तर चर्चा केली.
सध्या राज्यात कोरोनाच्या दुस-या लाटेचा उध्देक सुरु आहे. त्यामूळे याचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने उपायोजना केल्या जात आहे. याचाच भाग म्हणून चंद्रपूरात अनेक नियम आखूण देण्यात आले असून संचारबंदी लागु करण्यात आली आहे. मात्र सदरचे निर्बंध लावत असतांना सामान्य जनजिवन प्रभावीत होणार नाही याचा विचार करणेही अपेक्षीत आहे. व्यापारी वर्ग हा अर्थ व्यवस्थेचा कणा आहे. मोठ्या प्रमाणात कामगार व होतकरू लोकांचा दैनंदिन उदार निर्वाह या व्यापारावर अवलंबून असते. त्यामुळे निर्बंध लावतांना या संपूर्ण विषयाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या इतर भागातील कोविड - १९ रुग्ण वाढीच्या तुलनेत चंद्रपूर मध्ये सद्यस्थिती तितकीशी गंभीर स्वरुपाची नसून रुग्ण वाढीचा दर कमी आहे. कोविड - १९ च्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे नक्कीच गरजेचे आहे पण त्यासोबतच गरीब जनसामान्य जनतेच्या रोजगार व भरणपोषणाची नियोजन करणे तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे चंद्रपुरातील व्यापार व त्यावर वर अवलंबून असणारा कामगार यांचा विचार करत जनभावना लक्षात घेत आस्थापणे बंद ठेवण्याचा घेण्यात निर्णय मागे घेण्यात यावा व कोरोना बाबतचे नियम पाळून हे सर्व आस्थापणे पूर्ववत सुरु करण्यात यावे अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.


व्यापारी मंडळ व चेंम्बर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकारयांनी घेतली आ जोरगेवार यांची भेट

व्यापारी मंडळ व चेंम्बर ऑफ कॉमर्स च्या पदाधिकार्यांनी आ. किशोर जोरगवार यांची भेट घेऊन चंद्रपुरातील व्यापार बंद करू नका अशी मागणी केली. यावेळी रामजीवन परमार, प्रभाकर मंत्री, रामकिशोर सारडा, नारायण तोष्णीवाल, सुमेद कोतपल्लीवार, सुनील तन्नीरवार, दिनेश बजाज, राकेश तहलानी, चंद्रकांत उमाटे, सत्यम सोनी, अरविंद सोनी, हर्षवर्धन सिंघवी आदींची उपस्थिती होती.यावेळी व्यापारी मंडळ व चेंम्बर ऑफ कॉमर्स पदाधिकार्यांच्या मागणीची दखल घेत आ. किशोर जोरगवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून जनभावना लक्षात घेत व्यापार सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.