१ मे पासूनच्या लसीकरणाबाबतच्या शंकांचे निरसन करा भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ एप्रिल २०२१

१ मे पासूनच्या लसीकरणाबाबतच्या शंकांचे निरसन करा भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी

 १ मे पासूनच्या लसीकरणाबाबतच्या शंकांचे निरसन करा

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी

 

     १८ वर्षांपुढील वयोगटासाठी १ मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाबाबत जनतेच्या मनात असलेल्या शंकांचे राज्य सरकारने निरसन करावेअशी मागणी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केली.

     भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

     श्री. उपाध्ये म्हणाले कीलसीकरणासाठी तरुणांमध्ये उत्साह आहे. १ मे नंतर लसीकरणासाठीमोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडतील अशी अपेक्षा आहे.  सध्याचे लसीकरण आणि 1 मेपासून होणारे 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पाहता प्रत्येक महानगरपालिका क्षेत्र व जिल्ह्यानुसार लसीकरण केंद्रांची आकडेवारी जाहीर करावी.एक मेपासून लसीकरणासाठी होणारी अधिकची गर्दी ध्यानात घेऊन राज्य सरकारने जी लसीकरणासाठीची जास्तीची केंद्रे निश्चित केली आहेतत्यांची यादी जाहीर करावी.

     एक मेनंतर होणाऱ्या लसीकरणासाठी आयत्या वेळी येणाऱ्या नागरिकांना वॉक इनसाठी परवानगी असेल का ? की केवळ आधी ऑनलाईन नोंदणी केलेल्यांनाच लसीकरण केले जाईल,  याबाबतही  राज्य सरकारने खुलासा करणे आवश्यक आहे. तसेच लसीकरण मोफत आहे की सशुल्क आहे याबाबत आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचे काही मंत्र्यांच्या वक्तव्यावरून दिसते असल्याने लसीकरण मोफत आहे की नाही याचाही खुलासा राज्य सरकारने करावाअसे श्री. उपाध्ये यांनी सांगितले.