दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी रेड्डीला सहआरोपी करा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ एप्रिल २०२१

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी रेड्डीला सहआरोपी करा

कर्मवीर दादासाहेब कन्नमवार महिला प्रचार व समितीचे संघटक नेत्रा इंगुलवार यांचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना निवेदन 


चंद्रपूर :  दिवंगत दिपाली चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी हिचा मानसिक छळ करत तिला आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्यासोबत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक मेळघाट एम.एस. रेड्डी याला ही या गुन्हयात सहआरोपी करत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा याकरिता कर्मवीर दादासाहेब कन्नमवार महिला प्रचार व समिती, महाराष्ट्र तर्फे जिल्हाधिकारी चंद्रपूर मार्फत निवेदन, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना पाठविण्यात आला.

            यावेळी कर्मवीर दादासाहेब कन्नमवार महिला प्रचार व प्रसार समितीचे नेत्रा इंगुलवार, ललिता गंड्रतवार, अश्विनी आकुलवार आणि वंदना चेल्लावार आदी उपस्थित होते.