किल्ले हडसर वरील कमानी टाक्यात संवर्धन करताना भेटल्या दोन तोफा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१६ एप्रिल २०२१

किल्ले हडसर वरील कमानी टाक्यात संवर्धन करताना भेटल्या दोन तोफा

 किल्ले हडसर वरील कमानी टाक्यात संवर्धन करताना भेटल्या दोन तोफा
जुन्नर /आनंद कांबळे 

जुन्नर तालुक्यातील हडसर किल्ल्यावर कमानी टाक्यातील स्वच्छता करत असताना दोन तोफा सापडल्या अशी माहिती प्रा. विनायक खोत यांनी दिली.


गेली तीन वर्षापासून स्कोडा ऑटो फोक्सवॅगन प्रा.ली चाकण मधील  मरहट्टे सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन ग्रुप यांच्या मार्फत किल्ले हडसर गडावर गेली तीन वर्ष संवर्धनाच काम किल्ले संवर्धन संस्था शिवाजी ट्रेलच्या मार्गदर्शनाखाली अविरत चालू आहे.त्यात गडाचा मुख्य दरवाजा,दुसरा दरवाजा पायरी मार्ग,धान्य कोठार तसेच माहिती फलक,दिशा दर्शक फलक,नव्याने तयार करण्यात आलेला गडाचा पूर्ण नकाशा,अशी कामे आत्तापर्यंत करण्यात आली असून २०२१  पासून गडावर असणारे मुख्य पाण्याचं स्रोत असणारे कमानी टाके ग्रुप कडून संपूर्ण गळमुक्त करण्याचे काम हाती घेण्यात आले. हे टाके ५६ फूट × २३ फूट व खोली १५ फूट अस प्रचंड मोठं असुन या मधील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले.  शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी कंपनीतील सर्व जण संवर्धन करण्यासाठी योगदान देतात तर इतर पाच दिवस निमगिरी गावातील स्थानिकांना कंपनीच्या वतीने रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असून निमगिरीच्या ग्रामस्थांन मार्फत हे कार्य चालू आहे. कारण गेली अनेक वर्षे या ग्रामस्थांनी किल्ले निमगिरी वर काम केले असल्याने त्यांना संवर्धन कसे करावे याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली होती व त्याच पध्दतीने ते ऐतिहासिक वारसेस धोका न पोहचता काम करत असल्याने किल्ले हडसर वर पण तेच काम करत आहेत.

     आज टाकीतील दक्षिणेकडुन गाळ काढत असताना दोन तोफा कमानी टाकया मध्ये आढळून आल्या व त्यांना सुरक्षित पणे बाहेर काढण्यात आले. एक तोफ सात फूट लांबीची व बॅरल चार इचं व्यास असुन दुसरी तोफ सात फुट चार इंच लांब व बॅरल व्यास दोन इंच असुन सुंदर मकरमुखाची ही तोफ पहावयास मिळते.  या तोफांमुळे  नक्कीच किल्ले हडसरचा इतिहास अजून उलगडण्यात मदत होईल असे मत शिवाजी ट्रेल चे विनायक खोत ,मेजर रमेश खरमाळे यांनी वेक्त केलं. मरहट्टे सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन ग्रुप यांच्या मार्फत या तोफांना लवकरच तोफगाडे बसवून त्यांना संरक्षित करण्यात येईल. यावेळी निमगिरी ग्रामस्थ,अमोल ढोबळे,  विनायक खोत व  रमेश खरमाळे उपस्थित होते.