अत्यंत लोकप्रिय निष्कलंक राजकीय जीवन जगनारे, फार जवळीक असणारे विश्वासु व जिव्हाळ्याचे मित्र सहकारी संजय देवतळे यांच्या रूपात गमावला - हंसराज अहीर, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२६ एप्रिल २०२१

अत्यंत लोकप्रिय निष्कलंक राजकीय जीवन जगनारे, फार जवळीक असणारे विश्वासु व जिव्हाळ्याचे मित्र सहकारी संजय देवतळे यांच्या रूपात गमावला - हंसराज अहीर, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री

 अत्यंत लोकप्रिय निष्कलंक राजकीय जीवन जगनारे,  फार जवळीक असणारे विश्वासु व  जिव्हाळ्याचे मित्र सहकारी संजय देवतळे यांच्या रूपात गमावला - हंसराज अहीर, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री


       अत्यंत लोकप्रिय निष्कलंक राजकीय जीवन जगनारे, गेली ७ - ८ वर्षांपासून फार जवळीक असणारे विश्वासु व  जिव्हाळ्याचे मित्र सहकारी च्या रूपात संजय देवतळे  गेल्याने अतीव दुःख झाले. हि न भरून निघणारी हानी आहे, नेहमीच स्मरणात राहील असं व्यक्तिमत्व आम्ही गमावल अशी भावपूर्ण प्रतिक्रिया पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पूर्व पालकमंत्री तसेच भाजपचे जेष्ठ नेते संजय देवतळे यांच्या निधन वार्ता नंतर दिली आहे. नागपूर येथील रुग्णालयात कोविड शी लढतांना संजय देवतळे यांचे निधन झाले आहे.
   
     राजकारण व समाजकारणात अनेक नावे असतात मात्र राजकारणाच्या पलीकडे जनमानसात आपली ओळख निर्माण करून जगणारे नेते हे क्वचितच आढळतात त्यातील एक उदाहरण म्हणजे स्व. संजय देवतळे हे आहेत. त्यांच्यावर कोरोनाने घातलेला आघामुळे चंद्रपूर जिल्ह्याने एका सच्चा नेत्याला गमावले आहे त्यांचे असे जाने भाजपा व  जिल्ह्यातील नागरिकांची ची न भरून निघणारी हानी आहे. ईशर त्यांच्या आत्म्याला शांति देवो व त्यांच्या परिवाराला हा मोठा आघात सहन करण्याची ताकद देवो अशी प्रतिक्रिया पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर  यांनी दिली.  
     वरोरा विधानसभेत त्यांनी केलेली जनसेवा हि सदैवच तेथील नागरिकांच्या व सर्व नेत्यांच्या स्मरणात असेल. त्यांच्यासारखा नेता हा वरोरा विधानसभेत दुसरा होणे नाही अशी त्यांनी या विधानसभेतील नागरिकांच्या मनात छाप सोडलेली आहे. आमदार ते राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हा त्यांचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे असे यावेळी हंसराज अहीर यांनी सांगितले.
     देवतळे साहेब म्हणजे मृद भाषी, शांत व संयमी  स्वभावाचे धनी असल्याने जनमानसाच्या मनात त्यांच्याविषयी अपार आदर बघायला मिळायचा व त्यांच्या या गुण कौशल्याचा आपल्यालाही आकर्षण होते असेही अहीर यांनी प्रतिक्रियेच्या माध्यमातून सांगितले.
    संजय देवतळे यांनी आपल्या विरोधांत निवडणूक सुद्धा लढवली मात्र जिल्ह्यातील राजकारणाची गरिमा नेहमीच लक्षात घेत त्यांनी शब्दांच्या गरिमेचा बाण कधीच तुटू दिला नाही याबद्दल त्यांचा नेहमीच आदर वाटतो. त्यांच्या सह निवडणुकी लढविण्याचा अनुभव सुद्धा जीवनात नेहमीच आठवणींचा राहील त्यांच्या सारखा नेता होणे नाही   अशी भाव प्रतिक्रिया सुद्धा यावेळी हंसराज अहीर यांनी व्यक्त केली.