Top News

डिजिटल मीडियाचा श्रमिक पत्रकार वर्गवारीत समावेश | digital media

*‘ व्हॉईस ऑफ मीडिया’च्या लढ्याला मोठे यश* *ईलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल, रेडिओ आस्थापनांचा श्रमिक पत्रकार वर्गवारीत समावेश* *मुंब...

ads

मंगळवार, एप्रिल २०, २०२१

गोंदिया जिल्ह्यातील सर्व दुकाने व प्रतिष्ठानांची वेळ बदलली

गोंदिया जिल्ह्यातील सर्व दुकाने व प्रतिष्ठानांची वेळ बदलली

आता सकाळी 7 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंतसंजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.20 एप्रिल:-
Covid-19 कोरोनाव्हायरस विषाणूचा संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आपत्कालीन उपाय योजनेचा एक भाग म्हणून दिनांक 14 एप्रिल चे रात्री 8.00 वाजेपासून ते दिनांक 1 मे च्या सकाळी 7.00 वाजेपर्यंत संपूर्ण गोंदिया शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. सर्व प्रकारची जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा अंतर्गत असलेली सर्व प्रकारची दुकाने प्रतिष्ठाने ही संचार बंदी च्या कालावधीत दिनांक 30 एप्रिल पर्यंत यापुढे सकाळी 7.00 वाजेपासून ते दुपारी 11.00 वाजेपर्यंत खुली राहतील.
जिल्हाधिकारी गोंदीया यांच्या आज दि.20 एप्रिल च्या आदेशान्वये जिवनआवश्यक वस्तु किराणा ,भाजीपाला ,फळ विक्रेते ,दुध किंवा दुग्धजन्य पदार्थ ,कृषि संबंधी दुकाने हे सकाळी 7.00 ते 11.00 वां पर्यत चालु राहतील .घरपोच सेवा देणा-यांना सकाळी 7.00 ते रात्री 8.00 वां पर्यंत परवानगी आहे.सदरचे आदेश आज दिनांक 20/04/2021 पासुन ते 1/05/2021 चे 7/00 वाजेपर्यत लागु राहतील .वरील आदेशाचे पालन न केल्यास प्रचलीत कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल,असा इशारा आदेशात देण्यात आला आहे.
जीवनावश्यक वस्तू मध्ये मोडणारे किराणा, भाजीपाला, फळे,दुध डेअरी, मिठाई,बेकरी, सर्व प्रकारची खाद्यपदार्थ दुकाने,मटण,चिकन,मासे,अंडी विक्री चे ई.दुकाने व अत्यावश्यक सेवेत समावेश केलेले दुकाने सकाळी 7.00 वाजे पासून तर दुपारी 11.00 वाजे पर्यंत सुरू राहतील.
मात्र सर्व प्रकारची हॉस्पिटल, उपचार केंद्रे, लसीकरण केंद्रे, रुग्णालय, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालय, औषधी दुकाने, औषधी निर्माता कंपन्या, वैद्यकीय उत्पादनास संबंधित व वितरणा संबंधित विक्रेते यांची वाहतूक व त्यासंबंधी असलेली पुरवठासाखळी, औषधालय, रुग्णालय, नर्सिंग होम व वैद्यकीय प्रयोगशाळा, रुग्णवाहिका तसेच इतर वैद्यकीय व आरोग्य सुविधा, सेवा, लसीकरण, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरणे व त्याबाबत कच्चामाल पुरविणारे उत्पादक व वितरक, पेट्रोल पंप, पेट्रोलियम पदार्थ संबंधित उत्पादने, एटीएम केंद्रे यांना यातून वगळण्यात आलेले आहे. त्यांच्या या पूर्वी ठरलेल्या वेळा राहतील. तसेच या सेवाशी संबंधितांना प्रवासास मुभा देण्यात आली.सदर आदेश आज आज 20 एप्रिल च्या रात्री आठ वाजेपासून अमलात येणार आहे असेही या आदेशात म्हटले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या अंतर्गत स्वतःची काळजी घ्यावी.असे आवाहन नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार साहयक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर यांनी करून,अन्यथा प्रचलीत कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.