गडचिरोली जिल्ह्यात 15 मृत्यूसह आज 497 नवीन कोरोना बाधित तर 283 कोरोनामुक्त - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२३ एप्रिल २०२१

गडचिरोली जिल्ह्यात 15 मृत्यूसह आज 497 नवीन कोरोना बाधित तर 283 कोरोनामुक्त
गडचिरोली,(जिमाका)दि.23: 


आज जिल्हयात 497 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 283 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 17433 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 13056 वर पोहचली. तसेच सद्या 4082 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 295 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 15 नवीन मृत्यूमध्ये 67 वर्षीय महिला ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर, 67 वर्षीय पुरुष जि.चंद्रपूर , 54 वर्षीय पुरुष नवेगाव गडचिरोली, 65 वर्षीय महिला आरमोरी, 34 वर्षीय पुरुष पोलिस कॉलोनी गडचिरोली, 59 वर्षीय पुरुष विवेकांनद नगर गडचिरोली , 40 वर्षीय पुरुष वडसा , 54 वर्षीय पुरुष कुरखेडा , 65 वर्षीय महिला वडसा ,72 वर्षीय पुरुष विसारा ता.वडसा , 69 वर्षीय पुरुष आरमोरी , 52 वर्षीय पुरुष अहेरी, 44 वर्षीय पुरुष आमगाव ता.वडसा, 33 वर्षीय महिला चंद्रपूर, 40 वर्षीय पुरुष रामनगर गडचिरोली यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.89 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 22.42 टक्के तर मृत्यू दर 1.69 टक्के झाला.


नवीन 497 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 157, अहेरी तालुक्यातील 26, आरमोरी 55, भामरागड तालुक्यातील 0, चामोर्शी तालुक्यातील 57, धानोरा तालुक्यातील 35, एटापल्ली तालुक्यातील 23, कोरची तालुक्यातील 29, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 39, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 25, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 09 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 42 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 283 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 138, अहेरी 06, आरमोरी 25, भामरागड 05, चामोर्शी 11, धानोरा 08 , एटापल्ली 10, मुलचेरा 02, सिरोंचा 3, कोरची 12, कुरखेडा 19, तसेच वडसा येथील 44 जणांचा समावेश आहे.