हॉस्पीटलला भीषण आग; चार रुग्णांचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ एप्रिल २०२१

हॉस्पीटलला भीषण आग; चार रुग्णांचा मृत्यू

वाडीतील वेलट्रीट हॉस्पीटल आगीच्या विळख्यात

आयसीयुमधील एसीच्या शार्ट सर्कीटमुळे लागली आग


वाडी, ९ एप्रिल
वाडीजवळील वेल ट्रेल हॉस्पिटलला शुक्रवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात एक महिला व तीन पुरुषांचा मृत्यू झाला. ३० रुग्णांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
श्री. प्रकाश बोनडे, श्री. तुळसीराम पारधी, श्री. शिवशक्ती सोनबरसे, श्रीमती रंजना कडू असे मृत्यू पावलेले रुग्ण आहे .
येथील राष्ट्रीय महामार्गावरील वेलट्रीट हॉस्पीटलच्या दुसऱ्या माळ्यावरील जनरल वार्ड व तिसऱ्या माळ्यावरील आयसीयु मध्ये शुक्रवार ९ एप्रिल रोजी रात्री ८ .१५ वाजताच्या दरम्यान आयसीयुमधील एसीच्या शार्ट सर्कीटमुळे आग लागली असल्याची माहीती आहे .आयसीयु मध्ये दहा रुग्ण उपचार घेत होते. दहापैकी चार रुग्णाचा मृत्यू झाला.
एकूण 30 रुग्णाला इतर दुसऱ्या दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आहे . या आगीवर वाडी नगर परिषदचे अग्नीशमन विभागाचे रोहीत शेलारे यांच्या मार्गदर्शनात अग्नीशमन वाहनाने आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.

नागपुर के एक अस्पताल में आग लगने के समाचार से अत्यंत दुःखी हूँ। मैं दुःख की इस घड़ी में मृतकों के परिजनों के प्रति अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूँ व ईश्वर से घायलों के शीघ्र ही स्वस्थ होने की प्रार्थना करता हूँ।
@अमित शहा, गृहमंत्री