कोविड परिस्थितीत मूल्यमापन व निकाल पत्रक तयार करण्याची पध्दती - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१६ एप्रिल २०२१

कोविड परिस्थितीत मूल्यमापन व निकाल पत्रक तयार करण्याची पध्दती✍️ मिलिंद विठ्ठलराव वानखेडे

Covid-19 विषाणू संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीनुसार शैक्षणिक वर्ष २०२० - २०२१ मध्ये सर्वप्रथम *शाळा बंद शिक्षण चालू* हा उपक्रम सुरू केला. नंतर शासनाने २२ जुलै २०२० च्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना *Online Education* देण्याचे आदेशीत केले होते. १० नोव्हेंबर २०२० च्या परिपत्रकानुसार २३ नोव्हेंबर २०२० पासून इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता देण्यात आली होती.
*वर्ग प्रत्यक्ष सुरु होण्याआधी ब-याच शिक्षकांनी Online व जेथे Online शक्य नाही तेथे Offline किंवा दिक्षा अॅप व इतर साधनाचा वापर करून अध्यापन केले.* या सर्व परिस्थितीत विद्यार्थ्यांचे मुल्यमापन कसे करावे? याबाबत सतत विचारणा होत होती. त्यानुसार शासकीय पत्रक व शासन आदेशानुसार खालील प्रमाणे मार्गदर्शन करण्यात येत आहे.
*१) इयत्ता १ली ते ८ वी च्या मुल्यमापनाबाबत :-*
इयत्ता १ली ते ८ वी चे जे विद्यार्थी *Online व Offline* शिक्षणास उपस्थित होते किंवा शाळेत उपस्थित होते. त्यांचे मुल्यमापन करताना संदर्भ क्र.१ च्या पत्रानुसार आकारिक *मुल्यमापनाची किमान दोन साधन तंत्रे* (तोंडी काम, उपक्रम, स्वाध्याय व इतर) वापरून त्याचे गुण लक्षात घेता *मिळालेल्या एकूण गुणाचे १०० गुणांत रुपांतर करून श्रेणी देण्यात यावी*
उदा. इयत्ता १ ली ते ८ वी साठी
तोंडी काम १० पैकी ७ गुण तर स्वाध्याय १० पैकी ९ गुण असे एकुण १६ गुण.
एकुण २० पैकी १६ गुण होतात. याचे १०० गुणात रूपांतर म्हणजे १०० पैकी ८० गुण होतात. ८० गुणासाठी असलेली श्रेणी *ब-2* अशी येईल. याप्रमाणे प्रत्येक विषयासाठी श्रेणी देण्यात यावी.
*२) वर्गोन्नत शेराविषयी :-*
जे विद्यार्थी Online व Offline शिक्षण घेऊ शकले नाही किंवा स्थलांतरित झाले असतील अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्क अधिनियम २००९ कलम १६ नुसार पुढील वर्गात वर्गोन्नत करण्यात यावे. *RTE Act २००९ कलम १६ नुसार वर्गोन्नत* असा शेरा अशा नमुद करावा. (या विद्यार्थ्यांचे पुढील वर्षात पुनर्भरण करावे लागेल)
*३) हजेरी बाबद :* इयत्ता १ ली ते ९ वी व ११ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देणे आवश्यक आहे. त्यामुळे हजेरी क्षमापीत आहे.
*४)विशेष प्रशिक्षण:* इयत्ता १ ली ते ८ वी चे जे विद्यार्थी *क-२ पेक्षा कमी श्रेणी प्राप्त करतील* तसेच ज्या विद्यार्थ्यांना *RTE Act नुसार वर्गोन्नत* असा शेरा दिला असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला *विशेष प्रशिक्षणाचे* आयोजन करावे.
*५) मुल्यमापन:-* इयत्ता पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांचे आकारित व संकलित मुल्यमापन करण्यात येवू नये.
*६) निकालपत्रक: -* इयत्ता १ ली ते ८ वी च्या निकालपत्रकावर प्रथम सत्राच्या मुल्यमापनाबाबत कोविडमुळे *निरंक* असे लिहावे. व्दितीय सत्राच्या ठिकाणी मिळालेली *श्रेणी* लिहून *व्दितीय सत्राऐवजी वार्षिक निकालपत्रक* असे नमुद करावे.
*७) इयत्ता ९ वी व ११ वीच्या मुल्यमापनाबाबत : -* माध्यमिक शाळा संहिता नियम ३७ (३) व परिशिष्ट ७ (४) नुसार परिक्षा समिती स्थापन करावी. त्यानुसार मुल्यमापनाबाबत निर्णय घेण्यात यावा.
*मुद्दा क्रमांक ७.१-* यापूर्वी Online व Offline चाचणी घेतली असल्यास त्यात मिळालेल्या गुणाचे १०० गुणांत रुपांतर करावे.
*मुद्दा क्रमांक ७.२ -* चाचणी घेतली नसेल तर झालेल्या अध्यापनावर किंवा पूर्वज्ञानावर आधारित २० गुणांची चाचणी विद्यार्थ्यांना घरी सोडविण्याकरिता द्यावी. त्या उत्तरपत्रिका तपासुन मिळालेल्या गुणांचे १०० गुणात रूपांतर करून प्रचलित पध्दतीने निकालपत्रक तयार करावे
*मुद्दा क्रमांक ७.३ :-* वैकल्पिक विषयाचे मुल्यमापन नेहमीच्या पध्दतीने करावे व श्रेणी द्यावी.
*८) निकालपत्रकाचे वाटप :-* शारिरीक अंतर व कोविड -19 चे नियम पाळून निकालपत्रकाचे वाटप करावे
( *टिप-* मूल्यमापनाबाबदची सर्व माहिती शासकीय परिपत्रक, निर्णय याचा सखोल अभ्यास करून शिक्षकांना मूल्यमापन प्रक्रिया करतांना सुटसुटीत व्हावी या उद्दात हेतूने तयार करण्यात आली आहे)
*संदर्भ -* १) मा. संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचे पत्र शैसप्रपम/ मूल्यमापन / १ते८/ २०२१ दिनांक ८ एप्रिल २०२१
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय संकीर्ण २०२१ / प्रक्र ६६/ एस डी ६ दिनांक ८ एप्रिल २०२१
*वाचा:-* १) बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९
२) शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय पीआरई/ २०१०/ (१३६/१०)प्राशि ५ दिनांक २० आॅगस्ट २०१०
३) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचे पत्र दि १६ आॅगस्ट २०१९

✍️ *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
माजी शिक्षण मंडळ सदस्य
संस्थापक अध्यक्ष - विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघ)
9860214288, 9423640394