बाबासाहेबांची जयंती अत्यंत साधेपणाने साजरी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ एप्रिल २०२१

बाबासाहेबांची जयंती अत्यंत साधेपणाने साजरी

 नवेगावबांध येथे कोरोना प्रोटोकॉल पाळून  बाबासाहेबांना केले अभिवादन.


 बाबासाहेबांची जयंती अत्यंत साधेपणाने साजरी
संजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध ता.14 एप्रिल:-

भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वभुषण, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती येथे विविध ठिकाणी, अत्यंत साध्या पद्धतीने, कोरोना प्रोटोकॉलकालचे पालन करून साजरी करण्यात आली. covid-19 कोरोनाव्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या  पार्श्वभूमीवर आंबेडकर अनुयायांनी बाबासाहेब आंबेडकर यांची आपले घरी अत्यंत साधेपणाने साजरी केली व महामानवाला अभिवादन केले.

 प्रशिक बुद्धविहारात  बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. येथील पोलिस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर यांनी सकाळी साडेआठ वाजता ध्वजारोहण केले.  उपस्थितांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून अभिवादन केले. यावेळी  नगर बौद्ध समाजाचे अध्यक्ष रेवचंद शहारे ,समता सैनिक दलाचे हेमचंद लाडे, समाजाचे कोषाध्यक्ष देविदास बडोले, दुर्योधन राऊत,शितल राऊत, भिमाबाई सहारे, प्राध्यापक दिनेश जांभुळकर  ,शेवंताबाई टेंभुर्णे,  सचिन सांगोळकर, सरगम शहारे, रुपेश सांगोळकर, जगदीश शहारे उपस्थित होते. आंबेडकर अनुयायांनी सामाजिक अंतर राखत व कोरोना प्रोटोकॉल पाळून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. 

येथील ग्रामपंचायत कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, ग्राम विकास अधिकारी परशुराम चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य घनश्याम परशुरामकर, गुनीता डोंगरवार अर्चना पंधरे, लिलाबाई सांगोळकर, सविता बडोले, हरी डोंगरे उपस्थित होते.  येथील उमाबाई संग्रामे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य दत्ता संग्रामे , विद्यालयातील शिक्षक व कर्मचारी यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

येथील पंचशील बुद्ध विहारात अशोक डोंगरे व बोरकर यांनी बाबासाहेब आंबेडकर व महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून अभिवादन केले. येथील जेतवन बुद्ध भूमी प्रकल्प येथे राजेंद्र साखरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी  ठाणेदार जनार्धन हेगडकर,रेवचंद शहारे, ठाणेराव वैद्य, नरेश बडोले, आनंद जनबंधू,प्राध्यापक अश्विन लांजेवार,जगदीश बडोले,दीपक कराड,हेमचंद लाडे,नरेश टेंभुर्णे उपस्थित होते.