डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त मन्नेरवारलू समाजासह अनेकांनी केले अभिवादन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१४ एप्रिल २०२१

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त मन्नेरवारलू समाजासह अनेकांनी केले अभिवादन

किनवट: (बालाजी सिलमवार)-

- भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबडेकरांची जयंती १४ एप्रिल रोजी जगभरात मोठ्या धुमधडाक्यात साजरी होत असते. मात्र, कोरोनाच्या विळख्यात अख्खे जगच सापडले आहे. याही वर्षी देशभरात करोनाचे संकट असल्यामुळे डॉ. आंबेडकर जयंती एकत्रितपणे साजरी करण्यावर मर्यादा आल्या असल्या तरी कोव्हीड-१९ च्या सर्व नियमाचे पालन करून आज विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमीत्त नांदेड जिल्ह्यातील अंबाडी येथे आदिवासी मन्नेरवारलू समाजाकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अंबाडीत अभिवादन करण्यात आले.यावेळी मा.सरपंच कैलाश सिलमवार,राजुभाऊ सिलमवार,व्यंकटी संदुलवार,परमेश्वर मुराडवार,गोपाल सिलमवार,चिंटू मुरडवार, व्यंकटी पांडलवार, प्रथमेश सिलमवार,गजानन बावणे, राष्ट्रदीप कयापाक,सचिन ठमके ग्रामविकास अधिकारी व्ही. एम.राठोड यांच्यासह पोलीस जमादार पुंडलिक बोंडलेवाड,पोलीस शिपाई अनंतवार यांच्यासह अनेकानी आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.