मुख्यमंत्री महोदय, तुमच्या मंत्र्यांना आवरा : देवेंद्र फडणवीस यांचे खडेबोल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१० एप्रिल २०२१

मुख्यमंत्री महोदय, तुमच्या मंत्र्यांना आवरा : देवेंद्र फडणवीस यांचे खडेबोल


मुंबई | उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांकडे राजकारण करणाऱ्यांना समज द्या अशी मागणी केली होती. आज बैठकीत राजेश टोपे यांनी कोरोना राजकारणाचा शब्द काढला अन् फडणवीसांनी तोच धागा पकडला... महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीचं ऑनलाईन आयोजन केलं होतं. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक इशारा दिला. मुख्यमंत्री महोदय, तुमच्या मंत्र्यांना आवरा असं, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना म्हटलं आहे. हा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी का दिला? याची चर्चा आता सुरु झाली आहे. पूर्ण लॉकडाऊन केला तर जनतेचा उद्रेक होईल. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना आवरावं, सतत केंद्राकडे बोट दाखवाल, तर आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करु नका, असं ते म्हणाले.या बैठकीला भाजप नेते उपस्थित होते, यामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा समावेश होता.