कोविड रूग्णाच्या मदती करता युवा मोर्चा अग्रेसर..! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ एप्रिल २०२१

कोविड रूग्णाच्या मदती करता युवा मोर्चा अग्रेसर..!मागील १५ दिवसांपासुन कोविडचा हैदोस हा वाढतो आहे अश्यामध्ये माहनगर पालिकेने काही नियम लाऊन दिलेले आहेत की प्रत्येक कोविड रूग्णालयामध्ये जेथे कोविडवर उपचार होतो अश्या ठिकाणी ८० % बेड्स हे महानगर पालिकेने आखुन दिलेल्या दरपत्रकाप्रमाणे चालावे आणि उर्वरित २०% बेड्स हे खासगी प्रमाणे चालावे. अश्यात जेव्हा एखादा परिवार जेव्हा आपल्या घरच्या रूग्णाला दाखल करतो आणि जेव्हा डिस्चार्ज घ्ययची वेळ येते तेव्हा त्यांच्याकडुन मोठ्या प्रमाणात बिल घेण्यात येतं व ते जेव्हा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांसोबत संपर्क साधतात आणि युवा मोर्चा कार्यकर्ते तिथे तत्काळ पोहचतात रूग्णालय प्रशासनाकडे मागणी करतात की ऑडिटेड बिल द्यावे. बरेचदा रूग्णालयाचे प्रशासन हे त्याला नकार देतं व टाळाटाळ करतं मग युवा मोर्चा त्यांच्यावर दबाव निर्माण करते तेव्हा ऑडिटेड बिल देतात आणि ऑडिटरने बिल ऑडिट केल्यामुळे हजारोंचा फायदा हा रूग्णाच्या गरिब व मध्यमवर्गीय परिवारांना होतो. यामध्ये मागील १५ दिवसांमध्ये रेडियंस हॅास्पीटल, होप हॅास्पीटल, अरिहंत हॅास्पीटल, सुर्यादय हॅास्पीटल, वोकहार्ट हॅास्पीटल, सेंटर पॅाईंट हॅास्पीटल अशे काही हॅास्पीटल्समध्ये युवा मोर्चाचे कार्यकर्ते पोहचलेले आहेत आणि तिकडे जाऊन अनेक रूग्णाच्या नातेवाईकांना मदत केली आहे. अनुभव तर असे सुद्धा आहेत की साधारणत: ऐकेका बिलामध्ये पन्नास-पन्नास, साठ-साठ हजार रूपये तसेच एका बिला मध्येतर तब्बल १,२२,००० रूपये हॅास्पीटलने कमी केलेत. अशी जर का अडचण तुम्हाला आढळल्यास तुम्ही युवा मोर्चाची हेल्पलाईनवर फोन करू शकता युवा मोर्चा सदैव नागरिकांना मदत करायला अग्रेसर आहे. आपक्ण जर अश्या परिस्थिती सोमर जात असाल तर युवा मोर्चा सोबत संपर्क खालील दिलेल्या नंबरवर साधावा. 9022124640 हेल्पलाईन क्रमांक, भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले +919823531899, यश सातपुते +91 89834 13093, अमर धरमारे +91 93731 99787, सन्नी राऊत +91 878-8321060, +91 95953 38156 बादल राऊत, +91 98503 62319 शेखर कुर्यवंशी, +91 93268 14311 पंकज सोनकर यांच्या सोबत संपर्क करावा.

आपला नम्र,
प्रसाद मुजुमदार,
प्रसिद्धी प्रमुख, भाजयुमो नागपुर
8600968946