पिंपळगावखांबी व सिलेझरी येथे covid-19 लसीकरण केंद्र , सिरेगावबांध येथे एक कोरोना बाधित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ एप्रिल २०२१

पिंपळगावखांबी व सिलेझरी येथे covid-19 लसीकरण केंद्र , सिरेगावबांध येथे एक कोरोना बाधित

 पिंपळगावखांबी व सिलेझरी येथे covid-19 लसीकरण केंद्र,  सिरेगावबांध येथे  एक कोरोना बाधित 
संजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध ता. 4 एप्रिल:-


अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगाव बांध येथे दिनांक 2 एप्रिल ला एक व्यक्ती कोरोना बाधित आढळला. खबरदारीचा उपाय म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाकटी च्या वतीने सिरेगाव येथील ग्रामस्थांची covid-19 कोरोना चाचणी करण्यात आली. 50 व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. कोरोनाव्हायरस चा संसर्ग वेगाने होत असल्यामुळे, नागरिकांनी मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे व वारंवार साबणाने हात धुणे किंवा सॅनी टायझर चा वापर करणे,ही त्रिसूत्री सर्व नागरिकांनी पाळावी व स्वतःचे कोरोना संसर्गापासून संरक्षण करावे. असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्वेता कुलकर्णी डोंगरवार यांनी यावेळी ग्रामस्थांना केले. तपासणी कार्याला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वेता कुलकर्णी डोंगरवार, सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ.आरती काळे, आरोग्य सेविका खराबे, कातवले, वाहक उरकुडे यांनी सेवा दिली. तर सिरेगावबांध ग्रामपंचायत चे सरपंच इंजिनीयर हेमकृष्ण संग्रामे यांनी सहकार्य केले. आरोग्यवर्धिनी केंद्र   चान्ना बाकटीच्या वतीने आरोग्यवर्धिनी उपकेंद्र पिंपळगाव व सिलेझरी येथे covid-19 कोरोनाव्हायरस प्रतिबंधक लसीकरण केंद्र दिनांक 3 एप्रिल रोजी सुरू करण्यात आले. सिलेझरी आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात 120 तर पिंपळगाव उपकेंद्रात 70 असे एकूण दोनशे महिला पुरुषांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. अशी माहिती डॉक्टर कुलकर्णी यांनी दिली आहे. या लसीकरण केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वेता कुलकर्णी डोंगरवार यांच्यासह डॉ. कुंदन कुलसुंगे,आरोग्य सहाय्यक भारद्वाज, आरोग्य सेवक सातारे, आरोग्य तंत्रज्ञ साखरे ,आरोग्यसेविका शिंदे, राजगिरे,   चौबे, कोडापे ,पेंदाम, आशाबाई, आरोग्य सेवक दोनोडे, राऊत, शिक्षक कीर्ती मेश्राम, हंसराज खोबरागडे यांनी सेवा दिली. सरपंच ब्राह्मणकर, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्या यांनी या शिबिरांना सहकार्य केले. या लसीकरणाला स्थानिक महिला पुरुषांनी उत्तम प्रतिसाद दिला.