कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खांबी गावाच्या सर्व सीमा सील - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१० एप्रिल २०२१

कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खांबी गावाच्या सर्व सीमा सील

 खांबी  कोअर( कॅन्टोन्मेंट) झोन जाहीर.

 

कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खांबी गावाच्या सर्व सीमा सीलउपाययोजना करण्याविषयी उपविभागीय अधिकारी सोनाले यांनी घेतली गावदक्षता समितीची बैठकसंजीव बडोले प्रतिनिधी


नवेगावबांध दि.9 एप्रिल:-


खांबी येथील 25 व्यक्तीकोरोनाबाधित  आढळून आले आहेत. त्यामुळे या गावाला  आज दिनांक 9 एप्रिलला कोअर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या पूर्वी 30 मार्चला झाशीनगर हे गाव कोअरझोन घोषित करण्यात आले आहे.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी  येथील काही व्यक्ती कोरोना तपासणी केले असता, त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा आला. त्यामुळे संपूर्ण खांबी या गावास ईपीक सेंटर बनवून  संपूर्ण गाव  कन्टोनमेंट प्लॅन  कार्यान्वित करण्याकरिता, कोरोना आजाराच्या  प्रतिबंध करिता   प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सामावेश करण्यात आला. येणारे व जाणारे  सर्व मार्ग तात्काळ प्रभावाने बंद करून  सदर भागाच्या सीमा  आवागमनासाठी बंद करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले.खांबी येथे 25 व्यक्तीकोरोना बाधित आढळल्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.  कोरोणापासून दूरअसलेला अर्जुनी मोरगाव तालुका हळूहळू कोरोनाचा हाटस्पॉट ठरत आहे. खांबी येथील काही व्यक्तीची कोविड चाचणी केली असता कोरोना बाधित  आढल्यामुळे खांबी  या गावाचा  कोअर झोन( कन्टोनमेंट झोन) मध्ये  समावेश करण्याची घोषणा आज दिनांक 9 एप्रिल रोज शुक्रवारी अर्जुनी मोरगाव च्या उपविभागीय अधिकारी तथा विभागीय दंडाधिकारी शिल्पा सोनाले यांनी एका आदेशान्वये जाहीर केले आहे. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव इतर भागात पसरू नये, याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तसेच नागरिकांचे हीत व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून covid-19 विषाणूचा संसर्ग टाळण्याकरता खांबी चा   कोअर झोन  प्रतिबंधित क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. या क्षेत्रात जाणारे येणारे सर्व मार्ग तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आले आहे. तसेच आवागमनास सीमा बंद करण्यात आलेले आहे. सदर क्षेत्रातील लोकांना बाहेर जाण्यास व बाहेर क्षेत्रातील लोकांना इथे प्रवेश करण्यास पूर्णतः प्रतिबंधित करण्यात आलेला आहे.खांबी मध्ये 25 व्यक्ती पझिटिव्ह आढळून आल्या आहेत .त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आज 9 एप्रिल रोज शुक्रवारी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांच्यासह तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी यांनी तातडीने खांबी गावाला भेट देवून, गावातील परिस्थिती समजून घेतली. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून उपाययोजना सांगितल्या.

या वेळी घेण्यात आलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले होत्या. याप्रसंगी अर्जुनीमोर चे तहसीलदार विनोद मेश्राम, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.सुरेंद्र खोब्रागडे, ठाणेदार महादेव तोदले, गटविकास अधिकारी राजू वलथरे, सरपंच प्रकाश शिवनकर, पोलीस पाटील नेमिचंद मेश्राम, चान्ना आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कुंदन कुलसुंगे, भगवान मेंढे, ग्रामसेविका भैसारे, आरोग्य सेवक के.डी. शिंदे, एम.जी. राजगीरे, तलाठी सुरेश हरिणखेडे, कोमल रामटेके, उर्मिला दहिवले, उपसरपंच देवानंद रामटेके, पत्रकार अमरचंद ठवरे, विजय खोटेले, विकास डुंभरे, पुरुषोत्तम डोये, माणिक खोटेले, एन.सी. भारद्वाज, गोपाळ शिवनकर प्रामुख्याने उपस्थित होते.

 या सभेत डॉ.कुंदन कुलसुंगे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येणा-या सर्व गावातील व खांबी गावातील कोरोना प्रादुर्भावाची माहिती दिली. तसेच त्यावर आरोग्य विभाग राबवित असलेल्या उपाययोजनाची माहिती दिली. सभेत खांबी येथे येणारे रस्ते पिंपळगाव, ईंझोरी, निमगाव व बोंडगावदेवी मार्ग तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आले आहेत.जीवनावश्यक वस्तू जसे भाजीपाला, किराणा सामानाची विक्री करणारे यांची तपासणी करून बाहेर ये-जा करण्याची मुभा देण्यात आली आहे. शेतकर्‍यांना शेतीच्या कामासाठी ये-जासाठी रजिस्टरवर नोंद घेवून जाणे-येणे करु शकतील, गावातील सर्वच नागरिकांचीही कोरोना चाचणी करण्याचे ठरविण्यात आले. पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी पुढील आदेशापर्यंत गावात ठेवण्यास सांगण्यात आले. स्वस्त धान्य दुकानातील रेशन लाभार्थ्यांचे रेशन घरपोच नेवून देण्याचे ठरविण्यात आले. गावातील पानटपरी, हॉटेल पूर्णपणे बंद ठेवून केवळ किराणा दुकान सकाळी सात ते सांयकाळी सात वाजेपर्यंत सुरु राहतील, असे ठरविण्यात आले. लग्न समारंभ व इतर कार्यक्रम प्रतिबंधित कालावधीनंतरच करावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.