चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या


३० एप्रिल २०२१

चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू
चंद्रपूर/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात आलेल्या दुसऱ्या लाटेने चांगलेच कर केले आहे चंद्रपूर जिल्ह्यात आहे दररोज सुमारे 20 ते 25 कोरोना बाधित मृत्युमुखी पडत आहेत.
अशातच नागरिकांची अविरत सेवा करणारे कोविड योद्धे डॉक्टर्स बाधित होत आहेत. चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत 35 वर्षिय डॉ. प्रशांत चांदेकर यांचा कोरोनाने निधन झाले.
डॉ. चांदेकर हे शासकीय वैधकीय महाविद्यालयात असोसिएट प्रोफेसर व औषधी विभागात कार्यरत होते.
कोरोनाच्या भीषण काळात त्यांनी अनेक रुग्णांना सेवा दिली मात्र त्यांना सुद्धा कोरोनाने आपल्या बाहुपाशात ओढले.
डॉ. चांदेकर यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऑक्सिजनची पातळी कमी होत असताना महिला रुग्णालयात त्यांना नेण्यात आले.
ऑक्सिजन ची पातळी सतत खालावल्याने त्यांना तात्काळ नागपूर ला हलविण्यात येत होते. मात्र वरोराजवळ पोहचताच त्यांचा मृत्यू झाला.