चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१८ एप्रिल २०२१

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर
चंद्रपूर - महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ संलग्नित चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे नवे अध्यक्ष म्हणून दैनिक टाईम्स ऑफ इंडियाचे जिल्हा प्रतिनिधी मजहर अली यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

18 एप्रिलला पत्रकार संघाच्या सर्वसाधारण सभेत पार पडलेल्या निवडणुकीत दैनिक पुण्यनगरी चे जिल्हा प्रतिनिधी महेंद्र ठेमस्कर व टाइम्स ऑफ इंडियाचे जिल्हा प्रतिनिधी मजहर अली यांची थेट लढत झाली.

या निवडणुकीत 36 सदस्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, त्यामध्ये मजहर अली यांना 22 तर महेंद्र ठेमस्कर यांना 14 मतांवर समाधान मानावे लागले.
मावळते अध्यक्ष संजय तुमराम यांनी अध्यक्षपदाची सूत्रे अली यांना सोपविली.
नवनियुक्त अध्यक्ष मजहर अली यांच्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी दैनिक महाविदर्भचे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत विघ्नेश्वर, दै. नवराष्ट्र चे बाळू रामटेके सचिव पदी, सहसचिव म्हणून रोशन वाकडे, कोषाध्यक्ष पदी देशोन्नती चे प्रवीण बतकी, संघटक सचिव पदी दै. भास्करचे योगेश चिंधालोरे, कार्यकारणी सदस्यात दै. महासागर चे गौरव पराते, नवभारत चे कमलेश सातपुते, दै. हितवाद चे जिल्हा प्रतिनिधी रमेश कल्लेपल्ली, छायाचित्रकार देवानंद साखरकर यांचा सहभाग आहे.
नवनियुक्त कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.