चंद्रपूर देशातील चौथ्या क्रमांकाचे उष्ण शहर Chandrapur is the fourth hottest city in the country - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०२ एप्रिल २०२१

चंद्रपूर देशातील चौथ्या क्रमांकाचे उष्ण शहर Chandrapur is the fourth hottest city in the country
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसह सूर्याने आग कोकण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे लॉकडाऊनची दहशत तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेचा कहर सुरू आहे.

 चंद्रपूर हे देशातील आणि जगातील उष्ण शहरांच्या यादीतही आले आहे. बुधवारी चंद्रपूर हे देशातील चवथ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले.

बुधवारी देशात ओडिशातील भूवनेश्वर (४४.२ अंश) हे जगातील पहिल्या क्रमांकांचे, ओडिशातीलच भरीपदा (४३.६ अंश) हे दुसऱ्या, तामीळनाडू येथील इरोडे (४३.४ अंश) हे तिसऱ्या, तर राज्यातील चंद्रपूर (४३.२ अंश) हे चवथ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले. 

अकोल्यात ४१.६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरातसुद्धा ४१.१ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात बुलडाणा (३९ अंश) वळगता इतर सर्वच जिल्ह्यात पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे.