भद्रावती नगर मार्केट परिसरातील दोन दुकाने जळून खाक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ एप्रिल २०२१

भद्रावती नगर मार्केट परिसरातील दोन दुकाने जळून खाक◼️ वेळेत आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला

◼️ दुकानदाराचे चार लाखाचे नुकसान

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी):  
भद्रावती शहरातील मुख्य बाजारातील नगर मार्केट येथील मेडिकल स्टोअर व फुटपाथवरील दुकान आगीने  जळून खाक झाल्याची घटना सोमवारच्या मध्यरात्री घडली यात दुकानदाराची चार लाखांचे नुकसान झाले वेळेत आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला .
 नगर मार्केट येथील संजय वसंत बेलगावकर यांची मेडिकल व जनरल तसेच त्यांच्या समोर मंगेश सहारे यांचा पूजासाहित्य चे दुकान आहे येथे मध्यरात्री   दुकानाला आग लागली असल्याचे  येथील उपस्थितांना दिसले त्यांनी याबाबतची माहिती बेलगावकर यांना दिली . येथील नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनासुद्धा याबाबतची माहिती दिली त्यांनी त्वरित आग विझवण्यासाठी नगरपरिषदेचे अग्निशामक  चे वाहन आणण्याची सूचना केली परंतु ते नादुरुस्त असल्याने त्वरीत आयुध निर्माण येथे संपर्क करून अग्निशामक दलाला पाचारण केले व येथील लागलेल्या  आगी वर नियंत्रण आणण्यात आले. यात थोडाफार सुद्धा विलंब झाला असता तर संपूर्ण नगर मार्केट आगेच्या चपेटया त आले असते.  या दोन्ही दुकानदाराचे चार लाखाचे नुकसान झाले आहे .  मुख्याधिकारी पिदुरकर नगराध्यक्ष अनिल धानोरकर घटना स्थळीउपस्थित होते भद्रावती पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून ही आग शॉर्टसर्किटने  लागली असल्याचे नमूद केले असले तरी ही आग नेमकी कशामुळे लागली याचा पोलिस शोध घेत आहे.