२८ एप्रिल २०२१
Breaking News : अंगावरची हळद उतरण्यापूर्वीच काळाने तिला हिरावून नेले !
सुखी संसाराची मधुर स्वप्न रंगवत ती लग्नाच्या बोहल्यावर चढली ..सामाजिक रितीरिवाजानुसार तिचा विवाह पार पडला ..तिचा संसार सुरु झाला ..लग्न होऊन पंधराच दिवस लोटले तिची तब्बेत बिघडली ..उपचारासाठी तिच्या नवऱ्याने तिला माहेरी नेले ..उपचारही झाले पण व्यर्थ ! क्रूर काळाने तिला अलगद उचलले !
गोंडपिपरी येथे इंदिरा नगर वसाहतीत राहणाऱ्या शंकर म्हशाखेत्री या युवकाचा विवाह सावली तालुक्यातील पारडी येथील राणी हिच्याशी 8एप्रिल रोजी पार पडला.
रितीरिवाजानुसार आनंद अन उत्साहाच्या वातावरणात हा विवाह संपन्न झाला .सुखी संसाराची स्वप्न रंगवत दोघांचा संसार सुरु झाला.लग्नाला पंधरा दिवसच झाले असतील ,तिची तब्बेत बिघडली.
तब्बेत अधिकच बिघडत असल्याचे बघून शंकरने राणीला उपचारासाठी म्हणून तिच्या माहेरी नेले.तिथे बरेच उपचार झाले .पण व्यर्थ !क्रूर काळाने तिला आपल्या बाहुपाशात घेतले !
विवाह होऊन केवळ 20च दिवस झाले होते.
अंगावरची हळद उतरण्यापूर्वीच ती काळाच्या पडद्याआड झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
