राजस्थानातील ‘ह्या’ देवीसमोर औरंगजेबाने गुडघे टेकले होते - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२३ एप्रिल २०२१

राजस्थानातील ‘ह्या’ देवीसमोर औरंगजेबाने गुडघे टेकले होते

राजस्थानातील ‘ह्या’ देवीसमोर औरंगजेबाने  गुडघे टेकले होते 


दि. २३ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3sLHA7z
जीनमाता हे भारताच्या राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील एक गाव आहे. हे दक्षिणेस सीकर शहरापासून २ km कि.मी. अंतरावर आहे. श्री जीन माताजींना समर्पित एक प्राचीन मंदिर आहे. नवरात्रोत्सवात चैत्र आणि अश्विन महिन्यात वर्षातून दोनदा रंगलेल्या उत्सवासाठी लाखो भाविक येथे जमतात. आपल्या सह गतकाळातील आठवणी साठवून हे मंदिर आजही पाय रोवून उभी आहे. याचे आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही. असेच एक देवीचे मंदिर आहे राजस्थानमध्ये! ह्या मंदिराचे नाव आहे जीण माता मंदिर!
जयपूरपासून १२० किमी अंतरावर वसलेल्या ह्या मंदिराबद्दल सर्वात विचित्र म्हणा किंवा खास म्हणा अशी एक गोष्ट आहे ती म्हणजे येथे देवी भक्तांच्या हातात प्रसादाच्या रूपाने दारू प्राशन करते. ह्या मंदिराबद्दल एक अशीही गोष्ट रूढ आहे की, जीण मातेचे मंदिर तोडण्यासाठी दिल्लीचा बादशहा औरंगजेबाने सैनिक पाठवले होते, परंतु त्याला हे मंदिर पाडण्यात त्याला काही यश आले नाही.           
हिंदू द्वेषाने भरलेल्या मुघल बादशहा औरंगजेबाने हे मंदिर तोडण्यासाठी एकदा हल्ला करण्याची आज्ञा दिली. त्याच्या सैनिकांना पाहून गावकरी प्रचंड घाबरून गेले.त्यांनी मंदिर न तोडण्यासाठी सैनिकांना खूप मनधरणी केली, त्यांची हरएक प्रकारे विनवणी केली. परंतु, बादशहा काही माघार घेण्याच्या पवित्र्यात नाही हे पाहिल्यावर गावकऱ्यांनी मंदिरात जाऊन देवीची आराधना केली आणि अहो आश्चर्यम जणू देवीने त्यांची आराधना ऐकली.मंदिर तोडायला आलेल्या सैनिकांवर अचानक मधमाशांचीच्या झुंडीने हल्ला चढविला. घाबरलेल्या सैनिकांनी जीव वाचवण्याच्या उद्देशाने तेथून पळ काढला. असे म्हणतात की, दरम्यानच्या काळात औरंगजेबाआजारी पडला.

 त्याला कोणीतरी समजावले की देवीच्या अवकृपेमुळे हि परिस्थिती त्याच्यावर ओढवली आहे. आजार काही केल्या कमी होत नव्हता. शेवटी नाईलाजाने कट्टर इस्लाम मानणारा हा बादशहा देवीची माफी मागायला मंदिरात पोहोचला. त्याने जीण मातेची मनापासून माफी मागितली आणि मंदिरातील दिवा अखंड तेवत राहण्यासाठी दर महिन्याला सव्वा मण तेल अर्पण करण्याचं वचन बोलून दाखवलं. काही दिवसांतच बादशाह ठणठणीत झाला आणि म्हणतात तेव्हापासूनच मुघल बादशहाची या मंदिरावर श्रद्धा जडली.

राजस्थानातील ‘ह्या’ देवीसमोर औरंगजेबाने  गुडघे टेकले होते ,Aurangzeb was on his knees in front of the goddess 'Hya' in Rajasthan,

मंदिराबद्दल अजून एक आख्यायिका प्रसिद्ध आहे ती अशी की, जीण मातेचा जन्म घांघू गावातील एका चौहान वंशाच्या राजा घंघ यांच्या घरी झाला. मातेचा हर्ष नावाचा एक मोठा बंधू होता. दोन्ही भावंडांचाएकमेकांवर जीव होता. जीण मातेला शक्तीचे आणि हर्ष याला भगवान शंकराचे रूप मानले जाते. एकदा जीण माता आपल्या वहिनीसह पाणी भरण्यासाठी सरोवराकाठी गेली होती. तेव्हा दोघांत यावरून वाद झाला की, हर्ष सर्वात जास्त कोणावर प्रेम करतो? दोघींनी अशी पैज लावली की जिच्यावर डोक्यावरील घडा हर्ष अगोदर उतरवेल, त्यावरून हे स्पष्ट होईल की हर्ष सर्वात जास्त कोणावर प्रेम करतो.यानंतर दोघीही हर्षसमोर आल्या. हर्षने सर्वात आधी आपल्या पत्नीच्या डोक्यावरील मडके उतरवले आणि ही पैज जीण माता हरली. यामुळे नाराज होऊन जीण माता अरावलीच्या पर्वतरांगेतील काजल शिखरावर बसली आणि घोर तप करू लागली. हर्ष समजूत घालायला गेला, परंतु जीण माता परतली नाही आणि देवाच्या तपामध्ये लीन राहिली. बहिणीची समजूत काढण्यासाठी हर्षही भैरव तपस्येमध्ये लीन झाला. आता या दोघांची तपोभूमी जीणमाता धाम आणि हर्षनाथ भैरवाच्या रूपात प्रसिद्ध आहे.
ह्या जीण माता मंदिरात दरवर्षी चैत्र शुद्ध ते नवमीपर्यंत दोन यात्रा असतात. दरम्यानच्या काळात भाविक मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठी गर्दी करतात. केवळ राजस्थानातीलच नाही तर संपूर्ण भारतातील भाविकांमध्ये जीण मातेबद्दल अपार श्रद्धा आहे. यात्रेच्या काळात येथे रात्री जागरण करण्याची आणी दान देण्याची प्रथा आहे. अजून एक विशेष आकर्षण म्हणजे ह्या मंदिरात बाराही महिने दिवा अखंड तेवत असतो.तर मग कधी राजस्थानच्या ह्या भागात गेलात की ह्या विशेष मंदिराला नक्की भेट द्या..!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜♡☞
🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🥇      
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Aurangzeb was on his knees in front of the goddess 'Hya' in Rajasthan


On April 23, 2021

Jinmata is a village in Sikar district in the Indian state of Rajasthan. It is 2 km south of Sikar city. Is at a distance. There is an ancient temple dedicated to Shri Jin Mataji. Millions of devotees gather here for the Navratri festival, which is held twice a year in the months of Chaitra and Ashwin. This temple is still standing today, keeping the memories of the past with us. This does not go unnoticed. There is such a temple of Goddess in Rajasthan! The name of this temple is Jin Mata Mandir!
One of the strangest or most special things about this temple, which is situated at a distance of 120 km from Jaipur, is that the Goddess offers liquor to the devotees in the form of prasada. There is a rumor about this temple that Aurangzeb, the emperor of Delhi, had sent troops to demolish the temple of Jin Mata, but he did not succeed in demolishing the temple.
Filled with Hindu hatred, the Mughal emperor Aurangzeb ordered an attack to demolish the temple. The villagers were terrified when they saw his soldiers. They begged the soldiers not to break the temple and begged them in every possible way. But, seeing that the emperor was not in the sanctity of retreating, the villagers went to the temple and worshiped the goddess, and amazement as if the goddess had heard their adoration. The frightened soldiers fled for their lives. It is said that in the meantime, Aurangzeb fell ill.
 Someone explained to him that the situation was due to the humiliation of the goddess. The illness did not subside. Finally, Nilaja reached the temple to apologize to the emperor, a devout Muslim. He sincerely apologized to his mother and promised to offer a quarter of a mana of oil every month to keep the lamp in the temple intact. Within a few days, the emperor calmed down and it is said that the Mughal emperor had faith in this temple ever since.

Aurangzeb was on his knees in front of the goddess 'Hya' in Rajasthan,

Another famous legend about the temple is that Jin Mata was born in the house of King Ghangh of a Chauhan dynasty in the village of Ghanghu. The mother had an older brother named Harsh. Both siblings lived on each other. Mother Jin is considered to be a form of power and Harsha is considered to be a form of Lord Shiva. Once upon a time, Jin's mother had gone to the lake with her daughter-in-law to fetch water. The two then argued over who Harsh loves the most. Both of them made a bet that the pot on their head will fall on Harsh first, then it will be clear who Harsh loves the most. After this, both of them came in front of Harsh. Harsh first unloaded the pot on his wife's head and this paj jin mother lost. Annoyed by this, Jin Mata sat on the Kajal peak in the Aravalli range and began to do great penance. Harsh went to understand, but Jin Mata did not return and remained absorbed in the heat of God. Harsh also immersed himself in Bhairav's penance to make his sister understand. Now the Tapobhumi of these two is famous as Jinmata Dham and Harshanath Bhairava.
There are two yatras every year from Chaitra Shuddha to Navami in this Jin Mata Mandir. Meanwhile, devotees flock to seek the blessings of the mother. Devotees not only in Rajasthan but all over India have immense faith in Jin Mata. It is customary to wake up at night and donate during the pilgrimage. Another special attraction is that the lamp in this temple is uninterrupted for twelve months. If you have ever been to this part of Rajasthan, be sure to visit this special temple ..!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜ ♡
🥇 mahiti seva Group, Pethwadgaon
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂