जर्मनीतल्या १४ विद्यापीठामध्ये शिकवली जातेय संस्कृत भाषा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२२ एप्रिल २०२१

जर्मनीतल्या १४ विद्यापीठामध्ये शिकवली जातेय संस्कृत भाषा

जर्मनीतल्या १४ विद्यापीठामध्ये शिकवली जातेय संस्कृत भाषाफेसबुक लिंक http://bit.ly/3awBnWS
बर्लिन, दि. २० - संस्कृत ही भारतातील सर्वात प्राचीन भाषा. संस्कृत भाषेला हजारो वर्षांचा इतिहास आहे. एकेकाळी संस्कृत भाषा भारतीय संस्कृतीची ओळख होती. पण काळाच्या ओघात आज संस्कृत भाषेचे महत्व कमी झाले आहे.

जर्मनीतल्या १४ विद्यापीठामध्ये शिकवली जातेय संस्कृत भाषा

खरतर भारताने संस्कृत भाषेला पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. उद्या जर्मनीने संस्कृत भाषेवर आपला अधिकार सांगितला तर, आश्चर्य वाटायला नको ? कारण जर्मनीमध्ये संस्कृत भाषा अभ्यासाचा विषय बनली आहे. जर्मनीमधल्या आघाडीच्या १४ विद्यापीठांमध्ये संस्कृत भाषा शिकवली जाते.Ⓜ
दरवर्षी ऑगस्ट महिन्यात संस्कृत भाषेच्या वर्गाला प्रवेश मिळावा यासाठी जगभरातून अर्ज येतात. आतापर्यंत ३४ देशातील २५४ विद्यार्थ्यांनी संस्कृतच्या वर्गाला प्रवेश घेतला आहे. अनेक अर्ज आम्हाला नाकारावे लागतात प्राध्यापक डॉ. एक्सेल मायकल यांनी सांगितले.Ⓜ

र्मनीशिवाय अमेरिका, इटली आणि यूकेमधूनही विद्यार्थी संस्कृत शिकण्यासाठी येतात. संस्कृत भाषेला कुठल्या धर्माशी जोडणे किंवा राजकीय विचारधारेशी जोडणे हा मूर्खपणा असून, त्यामुळे या श्रीमंत भाषेचे नुकसान होते असे डॉ.मायकल यांनी सांगितले. प्राचीन तत्वज्ञान, विज्ञान, संस्कृती समजून घेण्यासाठी मूळ संस्कृतमध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्याचा अभ्यास आवश्यक आहे असे डॉ. मायकल यांनी सांगितले.Ⓜ