स्टेनलेस स्टील आणि स्टील यांच्यामध्ये काय फरक काय.? - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०२ एप्रिल २०२१

स्टेनलेस स्टील आणि स्टील यांच्यामध्ये काय फरक काय.?

स्टेनलेस स्टील आणि स्टील यांच्यामध्ये काय फरक  काय.?   


𖣘 दि. २ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/2PlsQ1I
    स्टेनलेस स्टील हे नाव देखील तुम्ही ऐकले असेल. तुम्हाला आतापर्यंत वाटत होते असेल की, स्टील आणि स्टेनलेस स्टील हे दोन्ही सारखेच आहेत. पण हा समाज चुकीचा आहे.स्टील आणि स्टेनलेस स्टील यांच्यामध्ये काही प्रमाणात फरक आहे. या दोन्ही गोष्टींमधील काही फरक आपण आज जाणून घेऊयात.

स्टेनलेस स्टील आणि स्टील यांच्यामध्ये काय फरक


स्टील आणि स्टेनलेस स्टील हे दोन्ही धातू जगभरामध्ये वापरण्यात येणारी सामान्य सामग्री आहे. व्यावसयिक आणि ग्राहक म्हणून याचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. स्टील आणि स्टेनलेस स्टील यांच्यामध्ये गुणधर्म शक्ती, लवचिकता, कडकपणा आणि किंमत इत्यादींमध्ये भिन्नपणा आढळतो. यांच्यातील काही मुख्य फरक आपल्यालाही उपयुक्त ठरू शकतात
स्टील हे लोखंड आणि कार्बन या दोघांना एकत्रित करून तयार केले जाते. यामध्ये लोखंडाचा कडकपणा येतो. तसेच, याला प्लेन कार्बन स्टील किंवा माईल्ड स्टील असे म्हटले जाते. जे कमी कार्बनिंग असलेल्या उच्च कार्बनचे घटक आहेत. दुसरीकडे स्टेनलेस स्टीलमध्ये उच्च क्रोमियमची मात्रा असते, जी स्टीलच्या पृष्ठभागावर अदृश थर तयार करते, जे त्याला स्टेनिंगपासून दूर ठेवते. स्टेनलेस स्टील हे स्टील, क्रोमियम, निकेल, नायट्रोजन आणि मोलिब्डेनम यांच्या मिश्रणाने तयार होते. स्टील हे लवकर खराब होऊ शकते किंवा त्याचा रंग जाऊ शकतो. पण स्टेनलेस स्टील हे लवकर खराब होत नाही आणि स्टीलच्या तुलनेत जास्त काळ टिकते.

ताकदीच्या आणि कडकपणाच्या बाबतीत स्टेनलेस स्टील हे स्टीलपेक्षा कमकुवत आहे, कारण यामध्ये कार्बनचे प्रमाण कमी असते आणि लोखंडाचे प्रमाण जास्त असल्याने स्टीलचा कडकपणा जास्त असतो
सामान्यतः स्टेनलेस स्टीलमध्ये चुंबकीय गुणधर्म नसतो, कारण स्टेनलेस स्टीलच्या ३०० श्रृंखलामध्ये क्रोमियम व निकेलचा समावेश असतो. ज्यामुळे ते गैर – चुंबकीय बनते, परंतु स्टेनलेस स्टीलची ४०० ची श्रुंखला ही केवळ क्रोमियमची असते, ज्यामुळे स्टील हे चुंबकीय गुणधर्माचे असते. कार्बन स्टील हे मॅट फिनिशिंगचे असते, त्यामुळे ते आकर्षक दिसत नाही. पण स्टेनलेस स्टील हे त्याच्या तुलनेत चमकदार असते. स्टेनलेस स्टीलवरील क्रोमियमची आवरण नैसर्गिक स्थितीमध्येच त्याला आकर्षक बनवत असल्यामुळे त्याला वेगळे पेंट करायची गरज नसते.
स्टेनलेस स्टीलच्या तुलनेत कार्बन स्टील हे अधिक जुळवून घेणारे, टिकाऊ आणि उष्णता वितरणास योग्य असते आणि मोठ्या प्रमाणावर उष्णता झेलू शकते. स्टीलच्या तुलनेत स्टेनलेस स्टीलची उष्णतेची वेधकता कमी आहे. कार्बन स्टील कडक आणि मजबूत असते.
त्यामुळे मोटर्स आणि विद्युत उपकरणांमध्ये स्टेनलेस स्टीलऐवजी कार्बन स्टील मोठ्या प्रमाणावर वापरले जाते, कारण त्याच्यामध्ये चुंबकीय गुणधर्म असतो आणि कार्बन स्टीलमध्ये वेल्डिंग देखील सहजपणे करता येते. स्टेनलेस स्टीलचा वापर कटलरीमध्ये आणि वॉच रॅपमध्ये होतो.
स्टीलचे वजन हे स्टेनलेस स्टीलपेक्षा कमी असते. सतत वाढत जाणाऱ्या गुणधर्मांमुळे स्टेनलेस स्टीलचे वजन जास्त असते आणि ते कमी क्षमतेचे असते, त्यामुळे त्याला उत्पादन प्रक्रियेमध्ये हाताळणे कठीण असते. स्टेनलेस स्टीलच्या तुलनेत कार्बन स्टीलचा नेहमी वापर केला जातो आणि त्याची किंमत कमी असते.
____________________________
WᕼᗩTᔕAᑭᑭ  9890875498* ☜♡☞
‼ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  ‼
______________________________