पांडवपुत्रांच्या हत्येपोटी भळभळती जखम घेऊन हिंडणाऱ्या ‘चिरंजीव अश्वत्थामा’ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२४ एप्रिल २०२१

पांडवपुत्रांच्या हत्येपोटी भळभळती जखम घेऊन हिंडणाऱ्या ‘चिरंजीव अश्वत्थामा’

पांडवपुत्रांच्या हत्येपोटी भळभळती जखम घेऊन हिंडणाऱ्या ‘चिरंजीव अश्वत्थामा’  


दि. २४ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/2QOnFaO

▪अश्वत्थामा बलिव्र्यासो हनुमांश्च विभीषण:।कृप: परशुरामश्च सप्तएतै चिरजीविन:॥सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित॥▪
      सप्त चिरंजीवांचा हा श्लोक अजूनही काही लोक त्यांच्या नित्य पाठामध्ये म्हणतात. ह्यात जगातील सात चिरंजीवांची म्हणजेच जे अमर आहेत त्यांची नावे सांगितलेली आहेत.आपल्या पुराणांमध्ये अश्वत्थामा,दैत्यराज बलि, वेद व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम आणि मार्कण्डेय ऋषि ह्यांना चिरंजीव मानले गेले आहे.ह्यापैकी एक अश्वत्थामा सोडल्यास बाकी सर्वांना वर म्हणून अमरत्व मिळाले आहे. पण कौरवांच्या सेनेचे नेतृत्व करणाऱ्या, कौरव पांडवांचे गुरु असणाऱ्या ऋषी द्रोणाचार्य ह्यांचा पुत्र असलेला अश्वत्थामा ह्याला चिरंजीवत्व म्हणजे वर नसून शाप मिळाला आहे.        

महाभारताच्या युद्धात महाभयंकर सर्वनाश झाला होता. अनेक कुळांचे अस्तित्वच ह्या पृथ्वीवरून नष्ट झाले होते. परंतु द्वापार युगात कुरुक्षेत्रावर झालेल्या महाभारत युद्धानंतर कौरवांचा शेवटचा सेनापती अश्वत्थामा हा अजूनही जिवंत आहे असे म्हणतात.खरं तर वैज्ञानिक दृष्ट्या असे होणे अशक्य आहे आणि हे सिद्ध करायला कुठलाही पुरावा नाही. पण पायी नर्मदा परिक्रमा केलेल्यांना तो दिसला आहे किंवा आपल्या गाठीशी तेवढे पुण्य असेल तर तो आपल्याला दिसतो अशी लोकांचीश्रद्धा आहे. काही लोकांनी त्याच्या पायांचे ठसे बघितल्याचा दावा केला आहे तर काही लोक तो कसा दिसतो, त्याची उंची किती आहे, त्याच्या कपाळावर कशी एक भळभळणारी जखम आहे आणि त्या जखमेवर लावायला तो कसं तेल मागतो हे वर्णन करून सांगतात.

पांडवपुत्रांच्या हत्येपोटी भळभळती जखम घेऊन हिंडणाऱ्या ‘चिरंजीव अश्वत्थामा’

हरियाणाच्या कुरुक्षेत्र या गावी किंवा काही तीर्थक्षेत्री तो दिसतो असेही काही लोक म्हणतात. तर मध्यप्रदेश च्या बुरहानपुर मध्ये असलेल्या किल्ल्यात काही लोकांना तो दिसला होता हा समजसुद्धा प्रचलित आहे.
आपले पिता द्रोणाचार्य ह्यांच्या वधाचा बदल घेण्यासाठी अश्वत्थामाने पांडवांवर नारायण अस्त्राचा प्रयोग केला. ह्या अस्त्रापुढे पांडवांच्या सेनेचेकाही चालले नाही. युद्ध सुरु असताना एका रात्री तो पांडवांच्या सैन्यात शिरला आणि त्याने दृष्टद्युम्नाचा वध केला. पांडव सेनेतील शिखंडी, युद्धमन्यु आणि उत्तमौजस सह अनेकांना त्याने मारून टाकले.पांडव झोपले आहेत असे समजून त्याने पाच झोपलेल्या व्यक्तीवरहल्ला केला आणि त्यांचा शिरच्छेद केला. पण ते पांडव नसून त्यांची म्हणजेच द्रौपदीची पाच मुले होती.
अश्वत्थाम्याच्या ह्या कृत्याची प्रत्यक्ष दुर्योधनाने सुद्धा निंदा केली असे म्हणतात. हा हल्ला झाला तेव्हा पांडव व भगवान श्रीकृष्ण दुसरीकडे होते. त्यांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांच्या राजकुमारांच्या मृत्यूचे त्यांना भयंकर दु:ख झालेआणि अश्वत्थाम्याचा राग आला. त्यांनी त्याचा शोध घेऊन त्याच्यावर हल्ला केला असताना त्याने परत ब्रह्मशीर्ष अस्त्राचा प्रयोग केला. ह्याचे उत्तर म्हणून अर्जुनाने सुद्धा अश्वत्थाम्यावर ब्रह्मशीर्ष अस्त्र सोडले.
पण ह्या दोन अस्त्रांची टक्कर झाल्यास पृथ्वी नष्ट होईल म्हणून वेद व्यासांनी आपल्या योगशाक्तीने त्यांची टक्कर होणे थांबवले व दोघांनाही हे अस्त्र मागे घेण्याविषयी आज्ञा केली. अर्जुनाने अस्त्र मागे घेतले. पण अश्वत्थाम्यास हे अस्त्र मागे घेता येत नव्हते. मग त्याला ते अस्त्र एखादा निर्मनुष्य ठिकाणी नेण्यास सांगण्यात आले.पण द्वेषाने विवेक नष्ट झालेल्या अश्वत्थामाने पांडवांचा निर्वंश व्हावा म्हणून हे अस्त्र उत्तरेवर म्हणजेच अभिमन्यूच्या पत्नीवर सोडले. तेव्हा ती गर्भवती होती.भगवान श्रीकृष्णाने तिचे व तिच्या गर्भातल्या पुत्राचे म्हणजेच परिक्षीताचे रक्षण केले व अश्वत्थाम्याला शाप दिला की,तो मरणासाठी भीक मागेल पण त्याला कधीही मृत्यू येणार नाही. त्याच्या दुष्कर्मांची शिक्षाम्हणून त्याला कधीही मृत्यू येणार नाही व त्याच्या जखमा कायम त्याला त्याच्या कुकर्माची जाणीव करून देत राहतील. तो एकटाच वर्षानुवर्ष भटकत राहील.
द्रौपदीने त्याला शाप दिला. त्याच्या डोक्यावरील मणी काढून घेऊन त्याची जखम अखंड भळभळत राहीलअसाही शाप दिला. तेव्हापासून ते आजातागायत अश्वत्थामा एकटाच जंगलात फिरतो आहे आणि आपल्या कर्मांचे फळ भोगतो आहे असे म्हणतात. इथपर्यंत तर बरेच लोक जाणतात. पण अश्वत्थाम्याविषयी काही गोष्टी अजूनही बऱ्याच लोकांना माहित नाहीत.
▪१. बुरहानपुरच्या शिवमंदिरात आजही रोज ताजी फुले देवाला वाहिलेली सापडतात.मध्यप्रदेशातील बुरहानपुरच्या जवळ असीरगढ येथे एक किल्ला आहे. त्या किल्ल्यात एक शिवचे मंदिर आहे. त्या मंदिरात जाणे अतिशय कठीण आहे तरीही तिथे रोज ताजी फुले वाहिलेली असतात असे म्हणतात.
मध्य प्रदेशातील एका गावात एक वैद्य राहतात. त्यांच्याकडे एकदा एक रुग्ण आला होता ज्याच्या शरीरातील जखमांतून रक्त वाहत होते. त्याच्या डोक्याला सुद्धा जखम होती. वैद्यांनी त्या माणसाचे परीक्षण केले आणि म्हटले की तुमच्या जखमा तर अनेक वर्षांपूर्वीच्या आहेत आणि बऱ्या होण्या सारख्या नाहीत. तुम्ही अश्वत्थामा आहात का? तर त्या रुग्णाने काहीच उत्तर दिले नाही. वैद्यांनी जेव्हा औषध देण्यासाठी पाठ फिरवली आणि नंतर परत त्या रुग्णाकडे बघितले असता तिथे कुणीही नव्हते.असे म्हणतात की तो अश्वत्थामाच होता. पायलट बाबा सारख्या योग्यांनी पण सांगितले आहे की त्यांची अश्वत्थाम्याशी भेट झाली आहे आणि तो हिमालयाच्या पायथ्याशी राहतो.
▪२. द्रोणाचार्यांनी इतर शिष्यांपेक्षा अश्वत्थाम्याला जास्त विद्या देण्याचा प्रयत्न केला होता.
जेव्हा गुरु द्रोणाचार्य पांडव व कौरवांना शिकवत होते तेव्हा त्यांचा एक नियम होता. त्या नियमाप्रमाणे द्रोणाचार्य ह्यांनी सर्व शिष्यांना पाणी भरण्यासाठी एक एक पात्र दिले होते. जो त्या पात्रात पाणी भरून आणेल त्याला ते गुप्त विद्या देत असत. ह्यापैकी स्वत:च्या पुत्रावरत्यांचे विशेष प्रेम होते आणि त्याला सर्वात जास्त विद्या मिळावी ह्यासाठी त्यांनी त्याला पाणी भरण्यासाठी छोटे पात्र दिले होते. त्यामुळे तो सर्वांपेक्षा आधीच पाणी घेऊन यायचा. तेवढ्या वेळात त्याला जास्त विद्या शिकण्यास मिळत असे.ही बाब अर्जुनाच्या लक्षात आली. तेव्हापासून तो वरुणास्त्राचा प्रयोग करून स्वतःचे पात्र लवकर भरत असे आणि विद्या ग्रहणास अश्वत्थाम्याबरोबर बसत असे. म्हणूनच अश्वत्थामा आणि अर्जुन तोडीस तोड होते.
▪३. त्याने नारायण अस्त्राचा प्रयोग पांडवांवर केला होता.
युद्धात जेव्हा दृष्ट्द्युम्नाने कपट करून गुरु द्रोणाचार्यांचा वध केला तेव्हा अश्वत्थामाला भयंकर क्रोध आला. त्याने पित्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पांडवांच्या सेनेवर नारायण अस्त्र सोडले. ह्याअस्त्रापुढे कोणाचे काहीही चालले नाही तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितले की, सर्वांनी आपापली शस्त्रे खाली ठेवून ह्या अस्त्राला शरण जा.हे अस्त्र शांत करण्याचा हा एकमेवमार्ग आहे. सर्वांनी तसे केल्याव नारायण अस्त्राचा प्रकोप शांत झाला व पांडवांचा जीव वाचला.
▪४. भगवान श्रीकृष्ण व अर्जुनावर आग्नेय अस्त्राचा परिणाम झाला नाही
 त्याच्या ह्या अधर्मासाठी भगवान श्रीकृष्णांनी त्याला शाप दिला की हजारो वर्ष तू पृथ्वीवर एकटाच भटकत राहशील. तुझ्या जखमा कधीही बऱ्या होणार नाहीत व तू कोणाशीही बोलू शकणार नाही. तेव्हापासून तो एकटाच रानावनात हिंडतो आहे. मृत्यूची आराधना करतो आहे पण त्याला मृत्यू सुद्धा त्याच्या कर्माचे फळ भोगण्यापासून मुक्त करू शकणार नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜♡☞
🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🥇     
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂