बर्मूडा ट्रँगल मध्ये घडलेल्या ५ विचित्र घटना - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१० एप्रिल २०२१

बर्मूडा ट्रँगल मध्ये घडलेल्या ५ विचित्र घटना

 बर्मूडा ट्रँगल मध्ये घडलेल्या   विचित्र घटना 


तारीख  10 एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3dRCHnT
प्लोरिडा आणि बर्मूडा या भूभागाच्यामध्ये असणा-या कांहीशा त्रिकोणी सागरी प्रदेशाला बर्मूडा ट्रँगल असे म्हणतात. भूतांचा त्रिकोण किंवा हुडू सागर असेही भयंकर नांव या भागाला आहे. गेल्या सहा दशकात शेकडोंनी अपघात झालेल्या या बर्मूडा ट्रँगलच्या ५ विचित्र घटना.
१. 🕧कोलंबसचा खराब झालेली दिशा दर्शक :🕧
सन १४९२ मध्ये प्रसिध्द दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबसने भूतांच्या त्रिकोणातील (बर्मूडा ट्रँगल) आपल्या प्रवासाची नोंद डायरीमध्ये केली आहे. तो म्हणतो की या प्रदेशात कांही गूढ मॅग्नेटीक ओढ आहे. बोटीवरील दिशादर्शक यंत्रे विचित्रपणे वागू लागली आहेत. आणि हो, एक आगीचा लोळ देखील नुकताच समुद्रात पडलेला खलाशांनी पाहिला आहे.

बर्मूडा ट्रँगल मध्ये घडलेल्या  ४ विचित्र घटना

२. ⛴शांत, गूढ एकही मनुष्य नसलेले ‘सेलेस्टे’ जहाज🚢 :
सन १८७२ आणखी एक भयंकर चक्रावणारीघटना समोर आली. नोव्हेंबर ७, जिनीव्हाला जाण्यासाठी ‘मेरी सेलेस्टा’ हे जहाज प्रवासी व खलाशीघेवून निघाले, एक महिन्यांनी बर्मुडा ट्रँगलमध्ये ‘मेरी सेलेस्टा’ इतर जहाजांना दिसली, परंतू एकाही मनुष्याविना. संपूर्ण जहाज त्यावरील साहित्य, मौल्यवान वस्तू अगदी जशाच्या तश्या होत्या. त्या शांत जहाजाला समुद्रात कमी होती ती फक्त मनुष्यांची.सर्वजण अगदी सागरात जणू दडून बसले होते..

३. ✈प्लाईट १९ विमानांचे अचानक नाहिसे होणे :✈
५ डिसेंबर १९४५ ला बर्मूडा ट्रँगलने एकाच वेळी पांच विमानांना गिळंकृत केले. रुटीन ट्रेनिंगला निघालेली तज्ञ पायलटची टीम असणारी पाच ऍव्हेंजर जातीची विमाने दुदैवाने परत येऊ शकली नाहीत. पायलटांचा प्रमुख चार्लस् टेलर, ज्याला त्या भागाची पूर्ण माहिती होती त्याने दिलेला शेवटचा संदेश फारच भयावह होता. तो म्हणतो, ‘सर्व कांही चुकलेले, वेगळे वाटत आहे. समुद्रसूध्दा नेहमीसारखा नाही. अगदी वेगळा,’ पांच विमानांचे अदृश्य होणे कमी होते की काय कारण या विमानांना शोधण्यास गेलेल्या मार्टीन मरीनरया मोठया विमानाचा देखील २३ मिनिटांनी स्फोट झाला. आज अखेर त्या पाच विमानांचा शोध लागलेला नाही.
४.⛴ नाहीशी झालेली १२,००० टनी यू.एस.एस. सायक्लोप्स🚢 :
बर्मूडा ट्रँगलने घेतलेला हा १२,००० टनी घास. सुमारे ५२२ फूटांची प्रचंड ‘सायक्लोप्स’ नांवाची अमेरिकन नौदलाची ही बोट. ८ जानेवारी १९१८ ला १०,००० टन माल व३०१ सैनिक घेवून बाल्टीमोरला जाणरी ही बोट अचानक बर्मूडा ट्रँगलला वळल्याची नोंद झाली. खरेतर हे सारे प्लॅन प्रमाणे नव्हते.कारण बर्मूडा ट्रँगल प्रवासातील मार्गात येतच नव्हते. १३ मार्चला जेंव्हा ही प्रचंड बोटकांहीच संदेश देईना तेंव्हा सा-या अमेरिकेने आपली सर्व सैनिकी ताकद लावून शोधमोहिम राबविली, परंतु तोपर्यंत १२,००० टनी घास घेवून बर्मूडा गुपचूप बसला होता.
______________________________
💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव   💖
✆ ░9░8░9░0░8░7░5░4░9░8░
______________________________