जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करावा? - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


३० एप्रिल २०२१

जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करावा?

जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करावा ? 


जमीनीबाबत अनेकांची तक्रार असते,यामुळे मोठमोठे वाद होतात.काही गावात तर जमिनिवरून खुनसुध्दा झाले आहेत. सातबारा काढला की,शेतकऱ्यांची जमीन किती आहे हे त्याच्या सातबाऱ्यावर दिसत असते.मात्र सातबारावर असणारी जमीन आणि प्रत्यक्षात असलेली जमीन यामध्ये अनेक वेळा तफावत होते.कोणी बांध सरकावलेला असतो तर कोणी हळुहळू जमीन दाबत नेलेली असते.याबाबत दोन्ही बाजुकडुन तक्रार होत असते.मग अशावेळी शासकीय पद्धतीने मोजणी करून घेणे हाच एक चांगला पर्याय असतो. अनेक वेळा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की, शेतजमीन मोजणीसाठी अर्ज कसा करावा? त्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात. या मोजणी प्रक्रियेसाठी किती शुल्क आकारले जाते, त्याचबरोबर सरकारची ई-मोजणी प्रणाली काय आहे? हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया.
📍साधी मोजणी: जी सहा महिन्याच्या कालावधीत केली जाते.
📍तातडीची मोजणी : तीन महिन्यात पर्यत करावी लागते.
📍अति तातडीची मोजणी: दोन महिन्याच्या आत केली जाते.

आपल्या शेतजमिनीची आणि त्याच्या अगदी बाबत शंका निर्माण झाल्यास आपण यासाठी सरकारी कार्यालया कडे दाद मागू शकतो यासाठी शेतकरी भूमिअभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उपअधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन कार्यालय यांच्या कार्यालयात तुम्ही अर्ज करू शकता या अर्जाचा नमुना उपलब्ध आहे.

जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करावा?

कसा भरावा अर्ज
१)वेबसाईटवर मोजणीसाठी अर्ज असे या अर्जाचे शिर्षक आहे. यामध्ये सुरुवातीला तुम्ही ज्या तालुक्यात कार्यालयात अर्ज सादर करणार आहात त्या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव टाकावे लागते.
२)त्यानंतर पहिल्या पर्याय पुढे अर्जदाराने आपले संपूर्ण नाव आणि पत्ता याविषयी माहिती भरावी. यात अर्जदाराचे चे नाव, गावाचे नाव, तालुका आणि जिल्ह्याचे नाव आवश्यक असते.३)त्यानंतर मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मोजणी प्रकाराचा तपशील हा दुसरा पर्याय असतो यातील मोजणीच्या प्रकार समोर कालावधी आणि उद्देश लिहावा लागतो. त्या पुढे पुन्हा तालुक्याचे नाव, गावाचे नाव, शेत जमीन ज्या गट क्रमांकात येतो गट क्रमांक आवश्यक असतो.
४)तिसरा पर्याय सरकारी खजिन्यात भरलेल्या मोजणी फी ची रक्कम याबाबत सविस्तर तपशील सादर करावा लागतो. त्यासाठीचा चलन किंवा पावती क्रमांक आणि दिनांक लिहावे. मोजणीसाठी जी फी आकारली जाते तिची रक्कम किती क्षेत्रावर मोजणी करायचे आहे किंवा ती किती कालावधीमध्ये करून घ्यायचे आहे यावरून ठरत असते.
एक हेक्टर साधी मोजणी करायची असल्यास एक हजार रुपये आणि तातडीच्या मोजणीसाठी दोन तर अति तातडीची मोजणी साठी तीन हजार रुपये आकारले जाते. त्यामूळे किती कालावधीत तुम्हाला मत मोजणी करून घ्यावी आवश्यक आहे. त्यानुसार कालावधी कॉलम मध्ये लिहू शकता.
उद्देश: या पर्याय समोर शेतकऱ्यांना मोजणीचा उद्देश लिहावा लागतो. जसे की शेत जमिनीचा वाद जाणून घ्यायचा आहे, कोणी बांधावर अतिक्रमण केला आहे काय? याप्रमाणे आपला जो उद्देश असेल ते आपण देऊ शकतो.
यापुढील चौथ्या प्रकारात आपण सातबारा उतारा प्रमाणे जमिनीत वाटेकरी कोण कोण आहेत, म्हणजे ज्या गट क्रमांक ची मोजणी आणायची आहे त्या क्रमांकाचा सातबारा उतारा, एकापेक्षा अधिक जणांची नाव असेल तर त्यांची नावे पत्ता आणि मोजणीसाठी या सगळ्यांची समिती आवश्यक असते संमती दर्शकाच्या सह्या यावर आवश्यक असतात
लगतची जमीन त्यांची नावे आणि पत्ता याची माहिती पाचव्या पर्यायात लिहावे लागते. तुमच्या शेताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या चार दिशांना ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या शेतकऱ्यांचे नाव आणि पत्ता त्या त्या दिशेने समोर लिहिणे आवश्यक असते. ही जमीन मोजण्यासाठी मोजणीचा अर्ज मोजणीची फी चलन किंवा पावती तीन महिन्याच्या आतील सातबारा ही कागदपत्रे प्रामुख्याने लागतात.

📍स्थावर मालमत्ता
जर तुम्हाला शेतजमीन व्यतिरिक्तही तर जमिनीची असलेली स्थावर मालमत्ता म्हणजे घर बांधला उद्योगाची जमीन याची मोजणी करायची असेल किंवा हद्द निश्चित करायचे असेल तर तीन महिन्याच्या मिळकतीची पत्रिका जोडावी लागते. ही सगळी माहिती भरून झाल्यावर योग्य कागदपत्र सहित मोजणीचा अर्ज कार्यालयात जमा करावयाचा आहे. अर्ज जमा झाला की तो ई-मोजणी या प्रणालीत नोंद होतो. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून मोजणी साठी किती रक्कम लागणार त्याचे चलन जनरेट केले जाते. त्या चलनाची रक्कम शेतकऱ्यांना बँकेत जाऊन भरणे आवश्यक असते त्यानंतर मोजणीचे नोंदणी क्रमांक तयार होते.त्यानंतर शेतकऱ्यांना मोजणी अर्जाची पोच दिली जाते. ज्यामध्ये मोजणीचा दिनांक, मोजणीस येणारा कर्मचारी यांचा मोबाईल क्रमांक, कार्यालय प्रमुख, त्यांचा मोबाईल अशी सविस्तर माहिती असते. वरील प्रणाली ही offline system  आहे. तर अभिलेख विभाग ऑनलाईन पद्धतीने जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया राबवत आहे. यालाच ई-मोजणी असे म्हटले जाते. सध्या यासंबंधीचे सॉफ्टवेअर विकसित करण्यावर करण्याचे काम सुरू आहे लवकरच ते विकसित होईल व आधिक जलद गतीने ही ई मोजणी प्रक्रिया राबवली जाईल.

___________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 9890875498
___________________________