सैन्यातील कुत्र्यांना नंतर ठार मारले जाते...कारण.. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२४ एप्रिल २०२१

सैन्यातील कुत्र्यांना नंतर ठार मारले जाते...कारण..

सैन्यातील  कुत्र्यांना नंतर ठार मारले जाते...कारण..


फेसबुक लिंक http://bit.ly/3nhFafF
कुत्रा हा एक इमानदार प्राणी म्हणून ओळखला जातो. कुत्रा हा आपल्या मालकाशी नेहमी इमानदारीने वागतो. तो आपल्या मालकाच्या सर्व गोष्टी मानतो. तसेच, कुत्रा हा अत्यंत चपळ आणि हुशार प्राणी आहे. त्याला योग्यप्रकारे ट्रेनिंग दिल्यास तो गुन्हेगारांना शोधण्यासाठी देखील पोलिसांना मदत करतो.

सैन्यातील  कुत्र्यांना नंतर ठार मारले जाते...कारण..

सैन्यामध्ये माणसांबरोबरच हे कुत्रे देखील देशाचे रक्षण करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. असे देखील कितीतरी वेळा झाले आहे, जेव्हाकुत्र्याने स्वतःच्या जीवाशी खेळून एखाद्या सैनिकाचे प्राण वाचवले आहेत.               

सैन्यातील हे कुत्रे बॉम्ब, दारुगोळा आणि आतंकवाद्यांच्या ठिकाणांना शोधून काढण्यासाठी सैन्याची मदत करतात. कुत्र्यांच्या याच इमानदारीमुळेत्यांना माणसांचा खरा मित्र म्हटले जाते. एकवेळ तुमचा मित्र तुमची मदत करण्यापासून मागे हटेल,पण तुमचा कुत्रा कधीही मागे हटणार नाही.असे असूनही हे कुत्रे जेव्हा सैन्यामधून निवृत्ती घेतात, तेव्हा सैन्याद्वारेत्यांना गोळी मारून ठार करण्यात येते. पण ही विचार करण्याची गोष्ट आहे की, सैन्याची एवढी मदत करूनही या कुत्र्यांना का मारले जाते?
ह्यामागे एक विविष्ठ कारण आहे.
जेव्हा एखादा कुत्रा एक महिन्यापेक्षा जास्त आजारी राहिला किंवा आपली ड्युटी योग्यप्रकारे करू शकला नाही, तर त्या कुत्र्याला अॅनिमल यूथेनेशिया नावाचे विष देऊन मारून टाकले जाते. सैन्यामध्ये कुत्र्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना मारून टाकण्याची परंपरा खूप जुनी आहे. हे त्या काळापासून चालत आलेले आहे, जेव्हा इंग्रज भारतावर राज्य करत होते.कुत्र्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना मारून टाकण्याचे पहिले कारण हे आहे की, कुत्र्यांना सैन्याच्या बेस लोकेशनची पूर्ण माहिती असते, तसेच त्यांना सैन्याचे कितीतरी गुप्त गोष्टी माहीत असतात. त्यामुळे या कुत्र्यांना एखाद्यासामान्य माणसाला देणे, हा सुरक्षेला खूप मोठा धोका ठरू शकतो.हा धोका टाळण्यासाठी सैन्य असा कटू निर्णय घेतं.

शिवाय कुत्र्यांना सैन्यामध्ये विशेष सुविधा दिल्या जातात, ज्यांची या कुत्र्यांना सवय लागते. सैन्यासारखी या कुत्र्यांना सुविधा देणे कोणत्याही माणसाला किंवा वेल्फेअर सोसायटीला खूपच कठीण असते.आणि एक कारण असे आहे की, सेना त्यांना दुसऱ्या कोणाकडे पाठवू इच्छित नसते. ते म्हणजे ह्या कुत्र्यांचा सन्मान…!या सैन्यातील कुत्र्यांना मारण्यापूर्वी त्यांना योग्य तो मानसन्मान सैन्याकडून दिला जातो. त्यांना त्यांनी केलेल्या कार्यासाठी विशेष आदरांजली वाहिली जाते आणि त्यानंतरच असे पाऊल उचलले जाते. जर कुत्रे रिटायर करून सोडून दिले तर ही आदरांजली देता येणार नाही…हे ते कारण!हे सर्व वाचून विचारात पडायला होतं…एकीकडे कौतुक वाटतं, भारतीय सैन्याचं…दुसरीकडे त्या कुत्र्यांसाठी वाईट वाटतं…
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂