माणसाचे निम्म्यापेक्षा अधिक शरीर ‘मानवी’ नाही! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

१३ एप्रिल २०२१

माणसाचे निम्म्यापेक्षा अधिक शरीर ‘मानवी’ नाही!

माणसाचे निम्म्यापेक्षा अधिक शरीर ‘मानवी’ नाही ! 


दि. १३ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3a6Ce0l
  आपल्या देहाला आपण अज्ञानाने ‘मी’ असे म्हणत असतो; पण या देहाचीही पुरती माहिती आपल्याला असत नाही. आता तर संशोधकांनी म्हटले आहे की मानवी देह हा निम्म्यापेक्षाही अधिक ‘मानवी’ नाही. माणसाच्या शरीरातील एकूण पेशींपैकी केवळ 43 टक्के पेशीच मानवी आहेत. अन्य पेशी म्हणजे निव्वळसुक्ष्म जीवांच्या वसाहती आहेत!     

माणसाचे निम्म्यापेक्षा अधिक शरीर ‘मानवी’ नाही !
      

मानवी शरीरातील या सुक्ष्म जीवांचे, जीवाणूंचे अध्ययन अॅलर्जीपासून पार्किन्सनपर्यंतच्या अनेक आजारांच्या संशोधनाचे मूळ आहे. या सुक्ष्म जीवांचा शरीरात इतका भडीमार आहे ही हा देह खरोखरच माणसाचाच आहे का, याबाबत विचार करावा लागेल, असेही संशोधकांचे म्हणणे आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट, मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटमधील मायक्रोबीओम सायन्स विभागाच्या रुथ ले यांनी याबाबतची माहिती दिली. त्या म्हणाल्या, हे सुक्ष्म जीव इतक्या मोठ्या संख्येने असले तरी ते सर्वच धोकादायक असतात असे नाही. हे जीव मानवी शरीरासाठी आवश्यकच आहेत. तुम्ही कितीही स्वच्छता पाळली तरी तुमचे शरीर हे जीवाणूंचे भांडार आहे ही वस्तुस्थिती बदलत नाही! अर्थात म्हणून बाह्य स्वच्छता पाळू नये, असा याचा अर्थ नव्हे. या अंतर्गत सुक्ष्म जीवांमध्ये वेगवेगळेजीवाणू, विषाणू, बुरशी आणि जीवाणूंसारख्या आर्कियांचा समावेश होतो. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील रॉब नाईट यांनी तर म्हटले आहे की तुम्हीमाणसापेक्षाही अधिक सुक्ष्म जीवच आहात!
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜♡☞
➰ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  ➰
______________________________