किल्ले कोहोजगड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत११ एप्रिल २०२१

किल्ले कोहोजगड

  किल्ले कोहोजगड  


दि ११ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3a1xcSG
शिवरायांनी कोहोजगड १६५७ च्या दरम्यान जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला. पुढे १२ जून १६६५ च्या पुरंदरच्या तहानुसार मोगलांना जे २३ किल्ले शिवरायांनी दिले, त्यात कोहोजगडाचा देखील समावेश होता. यानंतर ११ जून १६७० रोजी मराठय़ांनी हा गड परत जिंकून स्वराज्यात आणला. संभाजीराजांच्या कारकीर्दीत मोगलांचा मनसबदार व जव्हारचा जमीनदार विक्रम पतंगराव याने ७ एप्रिल १६८८ रोजी कोहोजगडाचा ताबा घेतला. असा हा निसर्गनिर्मित वैशिष्टय़ लाभलेला कोहोजगड दुर्गअवशेषांनीही श्रीमंत असून, ठाणे जिल्ह्य़ातील डोंगरी किल्ल्यात हा गड आपले वेगळेपण सिद्ध करणारा आहे.

पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यात निसर्गाच्या विस्मयकारक अदाकारीने लक्षात राहणारा असाच एक किल्ले कोहोज! या गडाच्या माथ्यावरील नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या मानवी आकारातील कातळकृतीने हा कोहोज दुरूनही लक्ष वेधून घेतो.

मुद्रसपाटीपासून ५७६ मीटर उंचीवर असलेल्या या किल्ल्यास भेट देण्यासाठी आपणास पालघरला पोहोचावे लागते. पालघरच्या एस.टी. स्थानकावरून सकाळी पावणेसात वाजता गडपायथ्याच्या नाणे गावासाठी बस सुटते. ही बस जर चुकली तर पहिल्यांदा मनोर गाव गाठावे. मनोर गावाहून साधारण दोन कि.मी. अंतरावर मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मस्तान नाका नावाचे ठिकाण आहे. येथून नाणे गाव साधारण बारा कि.मी. अंतरावर असून, नाक्यावर अनेक खासगी वाहने गडपायथ्याच्या नाणे गावास जातात. मस्तान नाक्यावरून मिळेल त्या वाहनाने तासाभराचा प्रवास करून आपण नाणे गावात दाखल व्हायचे. नाणे गावातील मुख्य चौकातच ध्वजस्तंभ असून, त्याचे शेजारीच ग्रामस्थांनी कोहोज गडावरील तोफ एका चौथऱ्यावर ठेवलेली आहे. आपण ही तोफ पाहून गावातून जाणाऱ्या वाटेने गडाकडे प्रस्थान करायचे. गड येईपर्यंत वाटेत पाणी नसल्यामुळे पाण्याच्या बाटल्या इथेच भरून घ्यायच्या.
साग व ऐनाच्या गर्द झाडीतून पायवाट पुढे-पुढे सरकते. घाम काढणारी, पण जंगलामुळे हवीहवीशी वाटणारी ही चढाई थोडय़ा वेळातच डोंगरसोंडेवर घेऊन येते. या डोंगरसोंडेला येऊन मिळालेली आणखीएक पायवाट वाघोटे गावाकडून इथपर्यंत येते. येथून डाव्या हातास जाणाऱ्या पायवाटेने डोंगराच्या काठाकाठाने आपण चालत राहायचे. पुढे आणखी चढाई केल्यानंतर आपण एका मोकळ्या पठारावर येऊन पोहोचतो व समोरच प्रचंड जहाजासारखा कोहोजगड दिसतो. नाणे गावातून या पठारावर पोहोचेपर्यंत साधारण दीड तास लागतो. पण ही चढाई जंगलातून असल्यामुळे फारसा थकवा जाणवत नाही. या पठारावरून आपण कोहोजगडचा कातळ डाव्या हातास ठेवत मळलेल्या वाटेने पुढे चालत राहायचे. अध्र्या तासात आपण कोहोजगडाच्या भग्न दरवाजात येऊन पोहोचतो. गडाच्या माचीत प्रवेश केल्यावर उजव्या हातास कोहोजचा बालेकिल्ला दिसतो. समोरच दिसते छोटेखानी कुसमेश्वर मंदिर! शेजारीच पाण्याची दोन टाकी पण त्यांचे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. कुसुमेश्वर मंदिराच्या मागे एक अत्यंत सुंदर, सुस्थितीतील शिल्प आहे. हे शिल्प पाहून गडाच्या माचीच्या एका कोपऱ्यावर असणाऱ्या सहा टाक्यांच्या समूहाजवळ पोहोचायचे. गडावर कोणतीच वास्तू मुक्कामयोग्य नसल्यामुळे गडास भेट देणारे या टाक्यांशेजारील सपाटीवर तळ ठोकतात. त्यांच्या राहण्याची निशाणी म्हणून तेथे तीन-चार दगडी चुली अगदी कायमस्वरूपी केल्यासारख्या बनविलेल्या आहेत.
माचीतील हे दुर्गावशेष पाहून बालेकिल्ल्याकडे कूच करायचे. बालेकिल्ल्याच्या खालच्या अंगावर एक भक्कम बुरूज बांधलेला असून, त्याच्या माथ्यावर हनुमंताची छोटी देवडी आहे. बालेकिल्ल्याचा हा पहिला टप्पा पक्की तटबंदी बांधून बंदिस्त केला असून, उजव्या हाताच्या गडाच्या कातळात तीन खांबटाकी कोरलेली आहेत. यातील पहिली दोन टाकी खराब असून, तिसऱ्या टाक्यातील थंडगार पाणी मात्र चढाईचा थकवा घालविणारे आहे. आपण या टाक्यातील पाण्याची चव चाखायची व कातळात खोदलेल्या छोटय़ा पावटय़ांनी बालेकिल्ल्याच्या दरवाजाकडे चालू लागायचं. दोन बुरुजांमध्ये बंदिस्त असा पश्चिमाभिुख महादरवाजा आहे. या दरवाजाच्या माथ्यावरची कमान आज शाबूत नसली तरी ती पाहिल्यानंतर सिंहगडाच्या कल्याण दरवाजाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.
बालेकिल्ल्यात डाव्या हातालाच हनुमंताची छोटी घुमटी असून, त्यातील मारुतीचे शिल्प देखणे आहे. कोहोज बालेकिल्ल्याच्या मध्यभागी दोन सुळके असून, या दोन्ही सुळक्यांच्या माथ्यावर जाता येते. इथून सभोवतालचा परिसर फारच सुंदर दिसतो. या दक्षिण टोकावर पोहोचल्यावर मागे वळून पाहिल्यावर दुसऱ्या सुळक्याचा निसर्गनिर्मित मानवाकार पाहून आपण काही क्षण थक्क होऊन जातो. मूळ काळ्या पाषाणाच्या मानवी देहासारख्या आकारावरील गोल दगडामुळे, म्हणजेच डोक्यामुळे या अमूर्त कातळाला मूर्त शिल्पाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. निसर्गनिर्मित मानवी पुतळ्याचे रूप कॅमेऱ्यात टिपून घ्यायचे व गडाच्या दक्षिण टोकावरील घुमटीकडे चालू लागायचं. या घुमटीत अलीकडेच कोणीतरी श्रीकृष्णाची मूर्ती बसविलेली आहे. आपण हे मंदिर पाहून आल्यावाटेने परत बालेकिल्ला उतरायला सुरुवात करायची. उतरताना खाली डाव्या हातास दोन पाण्याची टाकी दिसतात. पण ती पाणवनस्पतीने पूर्णपणे झाकलेली आहेत. एकदा तरी पहावा असा हा किल्ला आहे

किल्ले कोहोजगड  ,Fort Kohojgad
================================

Fort Kohojgad


April 11, 2021

Shivaraya conquered Kohojgad during 1657 and annexed it to the Swarajya. Later, according to the Purandar Tahan of 12 June 1665, the 23 forts given to the Mughals by Shivaraya included Kohojgad. After this, on 11th June 1670, the Marathas recaptured the fort and brought it under Swarajya. During the reign of Sambhaji Raja, Vikram Patangrao, a Mansabdar of the Mughals and a landlord of Jawahar, took possession of Kohojgad on 7 April 1688. Kohojgad fort, which has such a natural feature, is also rich in ruins and this fort proves its uniqueness in the hill fort in Thane district.
Kohoj is one such fort in Wada taluka of Palghar district, which is remembered for its wonderful performances of nature! The Kohoj attracts attention from afar with its naturally formed human-shaped carvings at the top of the fort.

To reach this fort, which is 576 meters above sea level, you have to reach Palghar. Palghar's S.T. The bus leaves the station at 7:00 am for Gadpayathya Nane village. If you miss this bus, you should reach Manor village first. About two km from Manor village. In the distance is a place called Mastan Naka on the Mumbai-Ahmedabad highway. Nane village is about 12 km from here. At a distance, many private vehicles go to Gadpayathya Nane village on Naka. We used to travel for an hour by vehicle from Mastan Naka to reach Nane village. There is a flagpole in the main chowk of Nane village and the villagers have placed the cannon on Kohoj fort on a square next to it. We used to see this cannon and leave for the fort on the way through the village. Since there was no water on the way to the fort, we used to fill water bottles here.
The footsteps move forward through the thicket of teak and mirrors. Sweaty, but the forest makes this climb seem desirable in a short time. Another step taken from this hill station is from Waghote village. From here we used to walk along the hill on the left hand side. After further climbing, we reach an open plateau and in front we see Kohojgad like a huge ship. It takes about an hour and a half to reach this plateau from Nane village. But since this climb is through the forest, I don't feel very tired. From this plateau, we used to walk along the dirt road with the steep slope of Kohojgad on our left hand. In half an hour we reach the broken gate of Kohojgad. Upon entering the fort, one can see the fort of Kohoj on the right hand side. A small Kusameshwar temple can be seen in front! Adjacent two water tanks but their water is not potable. Behind the Kusumeshwar temple is a very beautiful, well-maintained sculpture. Seeing these sculptures, one would approach a group of six tanks located at one corner of the fort. As there are no structures on the fort, visitors to the fort camp on the surface near these tanks. As a sign of their abode, there are three or four stone stoves built as if they were made permanent.
I used to march towards Balekilla after seeing the ruins of Machi. There is a strong tower on the lower part of the fort and a small porch of Hanumanta at the top. The first phase of the fort is enclosed by a concrete rampart, with three pillars carved into the rock on the right hand side of the fort. The first two tanks are bad, but the cold water in the third tank is exhausting. We used to taste the water in this tank and walk towards the gate of the fort with small paws dug in the rock. There is a west facing gate between the two bastions. Although the arch at the top of this door is not intact today, it will not remain unnoticed after seeing it.
There is a small dome of Hanumanta on the left hand side of the fort, in which the sculpture of Maruti can be seen. There are two cones in the center of Kohoj Balekilla, which can be reached at the top of both cones. The surroundings look very beautiful from here. Reaching this southern tip, looking back, we are amazed for a moment to see the natural human form of the second cone. Due to the original black stone round body shaped like a human body, i.e. the head, this abstract sculpture has acquired the form of a tangible sculpture. The form of a human statue made of nature was captured on camera and started moving towards the dome at the southern end of the fort. Someone has recently installed an idol of Lord Krishna in this dome. Once you see this temple, you would start descending Balekilla again. On the way down, two water tanks are visible on the left hand side. But they are completely covered with water vegetation. This is a fort worth visiting at least once