कडक मिरची "संकेश्वरची - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२६ एप्रिल २०२१

कडक मिरची "संकेश्वरची

 कडक मिरची "संकेश्वरची" 


दि २६ एप्रिल २०२१
दरवर्षी उन्हाळ्यात घरोघरी चटणी बनविण्याची लगबग असते. गडहिंग्लजची जवारी मिरची ‘संकेश्वरी मिरची’ नावाने ओळखली जाते. माद्याळ (ता. कागल), माद्याळ (ता. गडहिंग्लज), सुळे व आरदाळ (ता. आजरा), बसर्गे, हेब्बाळ, निलजी, हसूरचंपू, हरळी, हिटणी, महागाव, येणेचवंडी या भागातून जवारी मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जवारी मिरचीला योग्य गुणधर्म इथल्या मातीत आढळतात. मध्यम व खोल निचरा होणारी जमीन मिरचीला उपयुक्त ठरत असल्याने इथे मिरचीचे उत्पादन चांगल होते. जवारी मिरचीला एक विशिष्ट चव असल्याने कोकण, मुंबई, पुणे व कोल्हापुरातून या मिरचीला जास्त मागणी असते.पारंपरिक पद्धतीने बियाणे वापरून हे पीक घेतले जात असल्याने खाण्याला चवदार व तिखटाला ठसकेदार असते. यामुळे ही मिरची राज्यात प्रसिद्ध आहे.

कडक मिरची "संकेश्वरची"
साधारणत: जुलै-ऑगस्टच्या दरम्यान या मिरचीची लागवड होते. मिरचीला चांगली मागणी असल्याने याचे दर इतर मिरचीपेक्षा नेहमीच चढे असतात. वजनाला हलकी असली तरी लांब असल्याने मिरचीची आकर्षकता जास्त असते. यामुळे याचे दर इतर मिरच्यापेक्षा दुपटी तिपटीपर्यंत असतात.,या मिरचीचे वेगळे वैशिष्ट्य आहे,कमी पावसात जास्त उत्पादन लांबसडक आणि लालभडक मिरची जवारी मिरचीचे एस ३२ असे शास्त्रीय नाव आहे. या जातीची झाडे उंच असतात. मिरची 20 ते 25 सेमी लांब असून पातळ सालीची असतात. सालीवर सुरकुत्‍या असतात. वाळलेल्‍या मरचीचा रंग गर्द लाल असतो.वर्षाचा तिखट मसाला करण्यासाठी संकेश्वरची मिरचीला पंसती दिली जाते

____________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
____________________________