मराठ्यांचे सरसेनापती धनाजी जाधव यांनी 1699 - 1700 या कालखंडात उत्कृष्ट कामगिरी बजावली . त्यांनी झुल्फीकारखानाला दीड हजार मैल पायपीट करुन महाराष्ट्र भर फिरवले. ब्रम्हपुरीच्या मोगल तळावर पुन्हा पुन्हा हल्ले करून त्यांनी अशी काही दहशत निर्माण केली की औरंगजेबाला शेवटी आपली बायको व मुलगी यांना सुरक्षिततेसाठी म्हणून विजापूरला हलवावेसे वाटले.
आणि शेवटी त्यांना पेडगावला आणून ठेवावे लागले.
धनाजी जाधव यांनी सातार्याच्या मोगल छावणी वर पुन्हा पुन्हा हल्ले चढवले .
साधा लाकूड फाटा व गवतचारा आणण्यासाठी औरंगजेबाला भक्कम पथके बरोबर देऊन सरदारांना छावणी बाहेर पाठवावे लागे . छावणीत आणि खुद्द बादशहाच्या निवासस्थाना भोवती गस्त व पहारा यांची व्यवस्था करावी लागली.
धनाजी जाधवांचा दरारा किती होता हे यावरून समजते.
त्यांनी संभाजी महाराजांच्या तसेच राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धुरा वाहिली. संताजी मरण पावल्यानंतर धनाजींनी सरसेनापती पदाची सूत्रे हाती घेतली. शाहू महाराजांना छत्रपती बनवण्यात धनाजीं जाधवांचा मोठा वाटा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर धनाजी व संताजी यांनी मोठा पराक्रम केला. श्रीवर्धनहून साताऱ्याला आलेल्या बाळाजी भट व त्याच्या कुटुंबाला आधार देण्याचे काम धनाजी जाधव यांनी केले. धनाजी जाधव यानी शाहूमहाराजांकडे शिफारस केल्यामुळेच बाळाजी भटाला प्रथमतः पेशवाईची सूत्रे मिळाली.
रांगण्याच्या मोहिमेवरून परत येत असतांना पेठवड़गाव ता. हातकणगले जि. कोल्हापूर येथे त्यांचे आजाराने निधन झाले.त्यांच्या पत्नी गोपिकाबाई या सती गेल्या.पेठवडगाव येथे त्यांची व पत्नी गोपिकाबाई यांची समाधी आहे.
ही समाधी शोधण्यात पन्हाळ्याचे इतिहास संशोधक गुळवणी यांचा सिंहाचा वाटा आहे.
अनिल पाटील पेठवडगाव
9890875498