वडगाव रासाई - मंदिरात ३०५ वर्षांपूर्वीची प्राचिन घंटा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२७ एप्रिल २०२१

वडगाव रासाई - मंदिरात ३०५ वर्षांपूर्वीची प्राचिन घंटा

🔔  वडगाव रासाई - मंदिरात ३०५ वर्षांपूर्वीची प्राचिन घंटा !  🔔

_____________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
_____________________________

फेसबुक लिंक http://bit.ly/32OTanI
वडगाव रासाई,तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील रासाई देवीच्या मंदिरामध्ये सुमारे ३०५ वर्षांपुर्वीची पोर्तूगीज कालीन घंटा देवीच्या गाभाराच्या सभामंडपाच्या दालनात पहायला मिळते. या घंटेचा आवाज गेली तीन शतके गाव आणि परिसरामध्ये राहणाऱयांच्या कानी घुमत असून, इतकी वर्षे लोटली तरी ही घंटा आजही मजबूत अवस्थेत आहे.Ⓜ


गावच्या जुन्या इतिहासातील अत्यंत म्हत्वाची साक्ष म्हणून ही घंटा मोठया दिमाखात देवीच्या मंदिरात पाहणारांचे लक्ष वेधून घेते. या घंटेवर इसविसन १७०८ असे साल पहायला मिळत असून, घंटा पुर्णपणे ओतिव धातुची आहे. या घंटेचे वैशिष्ट्ये म्हणजे मंदिरामध्ये एकदा घंटा वाजविली तरी गावच्या कोपऱया-कोपऱयात आवाज जातो. आत्तापर्यंतच्या जुन्या घंटामध्ये हीचा समावेष होत असून, ही कोठे बनविली याचा इतिहास मात्र सांगता येत नाही. रासाई देवीचे मंदिर हे अत्यंत जुने आहे. मंदिर पुर्वे-पश्चिम दिशेस असून हेमाडपंथी बांधकाम आहे. या बांधकामाचा नेमका कालावधी सांगता येत नाही.माहिती सेवा गृप पेठवड़गावची पोस्ट,मंदिराच्या आवारात एक शिलालेख असून, त्यावर शके १५५० असा मजकूर आहे. हे ठाणे रेणुकेचे जागृत देवस्थान समजले जाते. गावाला जुना ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय वारसा आहे. देश पारतंत्रयात असताना येथे इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणारे एक स्वातंत्रविर आनंदस्वामी या गावात राहत होते. या सर्व घडामोडींमध्ये वरील घंटा या सर्व इतिहासाची साक्ष देत आजही सर्वांना वंदनीय आहे.Ⓜ पोर्तुगीज कालीन ही घंटा कोणातरी योद्धयाने लढाईत जिंकुन भक्तिभावाने रासाई देविला अर्पण केली आहे.पण तो भक्त कोण हे मात्र अज्ञात आहे