शेकापचा आदर्श घेऊन प्रत्येक तालुक्यात सुसज्ज कोव्हीड सेंटरची उभारणी करा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० एप्रिल २०२१

शेकापचा आदर्श घेऊन प्रत्येक तालुक्यात सुसज्ज कोव्हीड सेंटरची उभारणी करा

                 प्रविण चन्नावार यांची मागणी

   देशासह राज्यात व जिल्ह्यात कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेकापचे महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी स्वखर्चाने 50 ऑक्सिजन पुरवठा करणारे बेडसह कोरोना रुग्णासाठी अलिबाग येथे सुसज्ज कोव्हीड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला.हा निर्णय जनतेची सेवा हीच खरी ईश्वरसेवा होय याप्रमाणे कौतुकास्पद आहे.त्याप्रमाणे त्यांचा सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधीनी व पदाधिकारी यांनी आपआपल्या जिल्ह्यात कोरोनाचा वाढता उद्रेक बघता व कोरोना बाधितांची व त्यांच्या नातेवाईकांची होणारी हालअपेष्टा व कोरोना बाधितांना वेळेवर ऑक्सिजन बेडची कमतरता असल्यामुळे बऱ्याच लोकांना मृत्युला सामोरे जावे लागले.कालच तो चांगला होता व माझ्याशी मोबाईलवर बोलला असे अकस्मात काय झाले असे जणमाणसात ऐकायला मिळत आहे.ऑक्सिजन बेड आभासवी तडफडून मृत्यू डोळ्यासमोर बघायला मिळत आहे.त्यांच्या नातेवाईकांचा शोक अनावर होत आहे.हीच संधी आहे तुम्हाला त्यांच्या कामात यायची म्हणून सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी वेळ न दवळता आपापल्या लोकप्रतिनिधी व नेत्यामार्फत प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन पुरवठा करणारे बेडसह कोव्हीड सेंटर उभारण्याचा निर्णय घेऊन जनतेप्रति आतातरी जागरूक होऊन कामाला लागा असे कळकळीचे आव्हान सामाजिक कार्यकर्ते प्रविण चन्नावार यांनी केले आहे.