गुढीपाडवा म्हणजेच तेजोमय दिवस! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०६ एप्रिल २०२१

गुढीपाडवा म्हणजेच तेजोमय दिवस!

गुढीपाडवा म्हणजेच तेजोमय दिवस !  


𖣘 दि. ६ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/39LlDPe
    द्वादशमासैः संवत्सर।’ असे वेदात म्हटले आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. वर्षारंभाचा प्रारंभ दिवस ‘चैत्र शुध्द प्रतिपदा’ हा आहे. आज सर्वजण साजरा करत असलेल्या 1 जानेवारीला वर्षारंभ का ? याला शास्त्रीय आधार नाही. याउलट चैत्र शुध्द प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास अर्थात गुढीपाडवा साजरा करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत.

गुढीपाडवा या दिवशी सुरू होणार्‍या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणार्‍या तेजोमयी दिवसाशी करता येईल  तर 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता सुरू होणार्‍या नववर्षाची तुलना सूर्यास्तानंतर सुरू होणार्‍या तमोगुणी रात्रीशी करता येईल. निसर्गनियमाला अनुसरून केलेल्या गोष्टी मानवाला पूरक असतात. तर विरुध्द केलेल्या गोष्टी मानवाला हानीकारक असतात.

 यास्तव पाश्‍चात्य संस्कृतीनुसार 1 जानेवारीला नव्हे तर गुढीपाडव्याला नववर्षारंभ साजरा करण्यात आपले खरे हित आहे. गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन् कार्तिक शुध्द प्रतिपदा म्हणजे अर्धा असे साडेतीन मुहूर्त आहेत.शरीराला तेल लावून चोळून ते त्वचेत जिरविणे आणि नंतर ऊन गरम पाण्याने स्नान करणे म्हणजे अभ्यंगस्नान. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंगस्नान करतात. स्नानानंतर आम्रपल्लवांची तोरणे सिध्द करून प्रत्येक द्वाराशी लाल फुलासहित बांधतात. कारण लाल रंग शुभदर्शक आहे.

🔹गुढी उभारणे
गुढी सूर्योदयानंतर लगेचच उभारायची असते. अपवादात्मक स्थितीमध्ये (उदा. तिथीक्षय) पंचांग पाहून गुढी उभारावी. मोठ्या वेळूच्या (बांबूच्या) उंच टोकास पिवळ्या रंगाचे भरजरी कापड बांधतात. त्यावर साखरेच्या गाठी, कडूलिंबाची कोवळी पाने, आंब्याची डहाळी आणि लाल फुलांचा हार बांधून वर चांदीचा किंवा तांब्याचा कलश यांनी सजवून गुढी उभी केली जाते. गुढी उभे करताना ती मुख्य द्वाराच्या बाहेर परंतु उंबरठ्यालगत उजव्या अंगाला (घरातून पाहिल्यास) भूमीवर उभी करावी.

गुढीपाडवा म्हणजेच तेजोमय दिवस !

गुढी अगदी सरळ उभी न करता पुढील अंगाला (बाजूस) थोडीशी कललेल्या स्थितीत उभी करावी. गुढीपुढे सुंदर रांगोळी घालावी. गुढीची ‘ब्रह्मध्वजाय नमः’ असे म्हणून संकल्पपूर्वक पूजा करावी. इतर कोणत्याही पदार्थापेक्षा कडूनिंबात प्रजापति लहरी ग्रहण करण्याची क्षमता अधिक असल्याने गुढीपाडव्याच्या दिवशी कडूनिंबाचा प्रसाद खातात. कडुनिंबाची फुले, कोवळी पाने, चण्याची भिजलेली डाळ किंवा भिजलेले चणे, मध, जिरे आणि थोडासा हिंग एकत्र मिसळून प्रसाद सिध्द करावा आणि तो सर्वांना वाटावा
____________________________
WᕼᗩTᔕAᑭᑭ  9890875498 ☜♡☞
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
______________________________