'पाटील' शब्दाचा शोध - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१५ एप्रिल २०२१

'पाटील' शब्दाचा शोध

 'पाटील' शब्दाचा शोध


"पाटील" हा शब्द कानडीत 'ಪಾಟೀಲ' आणि तेलगुत 'పాటిల' अश्या पद्धतीने लिहिला जातो. याचा इंग्रजी अर्थ 'chief of village' असा होतो.

फेसबुक लिंक http://bit.ly/3gaPHYE
मराठी विश्वकोशात दिलेल्या माहितीप्रमाणे प्राचीन ग्रामसंस्थेतील गावाचा मुख्य वतनदार अधिकारी. ‘पट्टकील’ या संस्कृत शव्दांवरून ‘पाटील’ हा शब्द बनला आहे. कापसाचे विणलेले पट्ट गावकीच्या नोंदी विहिण्यासाठी पूर्वी वापरीत आणि ते वेळूच्या नळीत जतन करीत. या नळकांड्याला पट्टकील म्हणत. या शब्दावरून पुढे पट्टकील, पाटैलू, पाटेल, पाटील, या क्रमाने तो शब्द प्रचारात आला. वि. का. राजवाड्यांच्या मते चालुक्यादी घराण्यांच्या वेळी गणसंघातील काही गण गावगन्नाचे पाटैलू बनले आणि काही गण कुणबी झाले. तज्ञांच्या मते पाटीलकी हे वतन जमिनीच्या नांगरपटीबरोबरच उदयास आले असावे. पाटलाला ग्रामसंस्थेत प्रदेशपरत्वे कमी-अधिक मानमराबत असत. पाटलाला गावपाटील किंवा पाटील-मोकदम असेही म्हणतात. पाटील घराण्यात सर्वच पाटील आडनाव लावीत असले, तरी पाटीलकी उपभोगणाराच खरा पाटील असतो.Ⓜ

'पाटील' शब्दाचा शोध

शं. बा जोशी यांच्या मते 'पट्टा इल्ला'- पट्टीला हा शब्द प्राकुत असून पट्टी शब्दाला इला हा प्रत्यय लागला असून जो पट्टी मध्ये राहतो तो पट्टीला. मध्य-युगात पट्टीजन हा भाग नर्मदेच्या दक्षिणेला होते. हट्ट, हट्टी हे पट्टी या संस्कुत शब्दाचे कानडी रूप होय. आजसुद्धा पूर्वीचा बेरार भाग म्हणजेच हिंगोली,परभणी,वाशीम यांच्या आजूबाजूचा परिसरात हटकरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. धनगर आणि कुणबी समाजातील लोक पाटील म्हणून ओळखले जायचे त्याचा खरा मूळ अर्थ गावाचा प्रमुख नसावा कारण संपूर्ण समाजातील लोक हे एका गावाचे प्रमुख पाटील असू शकत नाहीत.
पाटीलकी हे वतन अनेक समाजात असल्याचे उल्लेख आढळतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे पणजोबा बाबाजीराजे भोसले यांना दौलताबाद जवळ वेरूळ परिसरातील देऊळगाव, हिंगणी, बेरडी, जिंती, वेरूळ, मुंगी, बनसेंद वगैरे दहा गावांची पाटीलकी असल्याची माहिती मिळते. देशमुखी खालोखाल पाटीलकीला महत्त्व होते आणि त्याचे वतनही वंशपरंपरागत चाले. जुन्या काळी पाटील हा जणू गावचा राजाच असे. महाराष्ट्रात प्रदेशपरत्वे त्यास भिन्न नावे आढळतात. जातपाटील, सरपाटील, जडेपाटील असेही भेद आहेत. यांशिवाय पोलीस पाटील व मुलकी पाटील, अशी एखाद्या गावात कामविभागणी असे. पाटील हा गावचा मुख्य मिरासदार असून त्याच्याकडे मुलकी, दिवाणी व फौजदारी अधिकार असत. गावचा सारा वसूल करणे, ही पाटलाची जबाबदारी असे. एखाद्या वर्षी रक्कम जमली नाही, तर ती त्यास भरावी लागत असे. पाटलाचे काम गावीची सुव्यवस्था ठेवून शांतता राखणे हे असे. गावाच्या सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी त्याच्या वर असे. म्हणूनच पाटीलगढी सर्वसाधारणपणे पूर्ण जबाबदारी त्याच्यावर असे. म्हणूनच पाटीलगढी सर्वसाधारणपणे त्याचावर असे. म्हणूनच पाटीलगढी सर्वसाधारणपणे गावकुसा जवळ बहुधा शत्रूच्या माऱ्याच्या ठिकाणी बांधलेली सर्वत्र आढळते. एका ऐतिहासिक कैफियतीत पाटील म्हणतो,Ⓜ ‘‘गावाची चाकरी, लावणी, उगवती वगैरे जे सरकारचे काम पडते, ते करीत असतो’’. यावरून त्याचा कर्तव्यांची कल्पना येते. त्यामुळे पीकपाणी, बलुतेदारांच्या तक्रारी, वतनदार, सामाजिक संस्थांची वतने, भांडण-तंटे इत्यादींची देखरेख व निवारण ही त्याची प्रमुख कामे होत. यांशिवाय सरकारी हुकुमांची अंमलबजावणी, गावात येणाऱ्या-जाणाऱ्यांची रबर मिळविणे इ. कामे असत. कामासाठी पाटलाला वार्षिक मुशाहिरा मिळत असे. त्यांना वतन इनामी जमिनीही दिलेल्या आढळतात. विविध समारंभाच्या प्रसंगी−शिमगा, दसरा, पोळा−पाटलाचा मान पहिला असे.माहिती सेवा गृप पेठवड़गावची पोस्ट,पाटील प्रमाणे कर्नाटकात नाडगौडा असावेत. एल्फिन्स्टनचा रिपोर्टप्रमाणे नाडगौडा- नाडू म्हणजे प्रांत अथवा जिल्हा आणि गांवडा (गौडा) म्हणजे त्यावरील एक अधिकारी. हा कानडी शब्द आहे. 

चोलसाम्राज्यांत हे नाडू पुष्कळ होते. सांप्रत कुर्ग प्रांतांत नाडू हा शब्द जिल्ह्यांनां लावलेला आढळतो. नाडगौडा हा अधिकारी महाराष्ट्रांतील देशमुखदेशपांड्यांच्या दर्जाचा असतो. मोकासबाब जी चौथाईंत दाखल केलेली असे, त्या मोकाशांतून एकंदर चौथाईच्या शेंकडा तीन टक्के इतकी रक्कम हक्काबाबत या नाडगौडास सरकारांतून मिळे. तिलाच नाडगौडी म्हणत. नाडगौडाचा अधिकार खुद्द छत्रपति देत व तो वाटेल त्याला मिळे व वाटेल तेव्हां काढून घेतां येई; हा हक्क वंशपरंपरेचा नसे. परंतु अभ्यासक संतोष पिंगळे यांच्यामाहितीनुसार हाटकर सरदार बंडगर, महार्णवर,आटोळे ,देवकाते यांना हे हक्क वंशपरंपरागत दिल्याचे आढळते.Ⓜ

_____________________________
  माहिती सेवा गृप पेठवड़गाव
_____________________________