धुळे येथे मंदिरात आहे, समर्थ रामदासांच्या हस्ताक्षरातील वाल्मिकी रामायण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१५ एप्रिल २०२१

धुळे येथे मंदिरात आहे, समर्थ रामदासांच्या हस्ताक्षरातील वाल्मिकी रामायण

धुळे येथे मंदिरात आहे, समर्थ रामदासांच्या हस्ताक्षरातील वाल्मिकी रामायण 


'रामायण' या वैश्विक काव्याने मानवी मन व्यापलं आहे. नाशिक परिसर तर या काव्याचा अविभाज्य भाग असल्याने रामायणाबद्दल प्रत्येकाच्या मनात वेगळं स्थान आहे. ३९५ वर्षांपूर्वी या काव्याची भुरळ समर्थ रामदासांनाही न पडावी तर नवलचं! पण समर्थांच्या सिद्ध हस्ताक्षरातील 'वाल्मिकी रामायण' आता नेमके आहे कुठे? असा प्रश्न अनेकांना पडतो. रामदासांच्या रामायण या अजब साहित्य‌िक कलाकृतीचा चारशे वर्षांचा प्रवास उलगडला असून, धुळ्यातील श्री समर्थ वाग्देवता मंदिरात समर्थांच्या रामायणाच्या जतनाचे काम सुरू आहे. यातील बालकांड ग्रंथ रूपाने उपलब्ध करण्यात आले आहे.

फेसबुक लिंक http://bit.ly/3gbmb4V
महादेवाने पार्वतीला सांगितलेली श्री रामाची कथा ही `अध्यात्म रामायण' नावाने प्रख्यात आहे. मात्र यापूर्वीही हनुमानाने शिलेवर रामायण लिहिल्याची अख्यायिका प्रसिद्ध असून, त्यास 'हनुमन्नाटक' असे म्हटले जाते. त्यानंतर महर्षी वाल्म‌िकींनी `रामायण'ची संस्कृत महाकाव्य रचना केली. गोस्वामी तुलसीदासने रामकथेला `श्रीरामचरितमानस'च्या नावाने आकार दिला. अशा अनेक अख्यायिकांनी रामायणाचा प्रवास थक्क करतो. महर्षी वाल्म‌िकी लिखित रामायणाला मूळ रामायण मानण्यात आल्याचे दिसते. नाशिककरांच्या दृष्टीने समर्थ रामदासांच्या स्वहस्ताक्षरातील वाल्म‌िकी रामायण म्हणजे नाशिकची साहित्यनगरी म्हणून झालेल्या प्रवासाचा अनोखा पुरावाच आहे. मात्र रामदासांच्या रामायणाचा प्रवास आजही अनेकांना अज्ञात आहे.

धुळे येथे मंदिरात आहे, समर्थ रामदासांच्या हस्ताक्षरातील वाल्मिकी रामायण

समर्थ रामदास इ. स. १६२० ते १६३३ असे साधारण १२ वर्षे टाकळी गावात तपश्चर्या व कठोर साधनेसाठी राहिले. यादरम्यान, बाल रामदासांनी गोदाकाठच्या पंडितांकडे वाल्म‌िकी रामायणाचे अध्ययनही केले. १६२२ मध्ये १४ वर्षांच्या रामदासांनी वाल्म‌िकी रामायणातील बालकांड संस्कृतमध्ये लिहून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अयोध्या, अरण्य, किष्किंधा व सुंदर ही पाच कांडे नाशिकमध्ये १६२४ पर्यंत पूर्ण केली व युद्ध व उत्तरकांड त्यांनी साताऱ्यातील मसूरमध्ये पूर्ण केले. मात्र, रामदासांच्या हस्ताक्षरातील रामायण ३१४ वर्षे बीडच्या मठात अज्ञात अवस्थेत होते. याचा शोध १९३५ मध्ये 'विदर्भाचे टिळक' म्हणून ओळखले जाणारे शंकरराव ऊर्फ नानासाहेब देव यांनी लावला व समर्थांचे रामायण धुळ्यातील वाग्देवता मंदिरात दाखल झाले, अशी माहिती वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष शरद कुबेर यांनी दिली.
असा लागला 'रामायणा'चा शोध 
३१४ वर्षांनंतर म्हणजे १९३५ मध्ये समर्थांचे शिष्य गिरिधरस्वामी यांच्या बीड येथील मठात समर्थांची मूळ प्रत 'विदर्भाचे टिळक' म्हणून ओळखले जाणारे शंकरराव ऊर्फ नानासाहेब देव यांना सुस्थितीत मिळाली. मात्र हा प्रवासही थक्क करणारा होता.
रामदासांनी लिहिलेलं रामायण कोठे आहे हे कोणालाही माहीत नव्हतं. १९३३ मध्ये नानासाहेब देव यांना हैदराबाद येथील इंदूरबोधन मठात बीड मठासंदर्भातील काही कागदपत्रे मिळाली. यातील दोन कागदपत्रांनी रामदासांच्या रामायणाचे रहस्य उलगडण्यास मदत केली. यातील एक कागद १७३१ चा, तर दुसरा १७४४ चा होता. दोन्ही कागद रामदासांचे कार्य पुढे घेऊन जाणाऱ्या भीमाजी गोसावी व यसोबा गोसावी यांच्यातील संपत्तीच्या वाटणीचा होता. तर दुसरे पत्र काही सामायिक वस्तूंचे विभाजन बाकी असल्याने ते १७४४ मध्ये १३ वर्षांनी करण्यात आले होते. यातून रामदासांनी लिहिलेले रामायणाची उकल झाली.

रामायणाचीही झाली वाटणी
भीमाजी व यसोबा यांच्यातील सामायिक वाटणीत समर्थांनी लिहिलेले वाल्म‌िकी रामायण, अध्यात्म रामायणाचा समावेश होता. अध्यात्म रामायण (श्लोक संख्या ६ हजार) हा ग्रंथ यसोबाजवळ होता, तर वाल्म‌िकी रामायण (श्लोक संख्या २४ हजार) भीमाजी जवळ होता. दोन्ही मिळून ३० हजार श्लोक संख्या झाली. त्यानुसार प्रत्येकाच्या वाट्याला १५ हजार श्लोक येणार होते. ६ हजार श्लोकांचा अध्यात्म रामायण ग्रंथ यसोबाकडे होता. त्यामुळे त्यांना वाल्म‌िकी रामायणातील ९ हजार श्लोक देणे होते. यानुसार, बाळकांड/ आदिकांडातील २८५० श्लोक, आयोध्या कांडातील ३९६० श्लोक व सुंदर कांडातील २९२५ श्लोक असे एकूण ९७३५ श्लोक देण्यात आले व उरलेले समर्थांची रामायणाची कांड भीमाजीकडे राहिली. अशा प्रकारे दोन भावांमध्ये समर्थांच्या रामायणाची वाटणी करण्यात आली. पुढे परंपरेने श्रीराम बुवा यांच्या मठात यसोबांकडील ग्रंथ संपदा आली. ही ग्रंथ संपदा अर्धवट होती. यामुळे सुमारे दीडशे वर्षांनंतर मठातील मंडळींनी भीमाजीकडील ४ कांड लिहून घेत यसोबाकडील ग्रंथसंपदेला पूर्ण स्वरूप दिले. ती कांडे नानासाहेब देव यांनी यसोबांच्या मठातून मिळविली. तर इतर कांडे भीमाजी बाबांच्या परंपरेतील सीताराम बाबा यांच्या मठात असली पाहिजेत हे लक्षात आल्यानंतर तीही २१ मे १९३४ मध्ये त्यांच्या बीड मठातून ताब्यात घेतली. यामुळे समर्थांचे वाल्मिकी रामायण पूर्णयामुळे समर्थांचे वाल्मिकी रामायण पूर्ण झाले.
२४ हजार श्लोक; १८२० पाने

रामदासांच्या बालकांड (श्लोक संख्या २ग्रंथ संपदेचे झाले जतन वाग्देवता मंदिरात समर्थांच्या या सर्व ग्रंथ संपदेचे जतन (रिस्टोरेशन) करण्यात आले आहेत. त्याचे डिजिटलायझेशनही झाले असून, समर्थांचे वाल्म‌िकी रामायणाचे सातही कांड सर्वसामान्यांपर्यंत पोहचावेत यासाठी वाग्देवता मंदिरातर्फे प्रयत्न सुरू आहेत. यातील पहिले बालकांड प्रकाशित करण्यात आले असून, त्यात समर्थांया हस्ताक्षरातील मूळ संस्कृत बालकांडाचे मराठी व इंगज्री अनुवाद करण्यात आला आहे.
समर्थांच्या सातही कांड समाजासमोर यावीत यासाठी प्रयत्न सुरू असून, यातील पहिले बालकांड ग्रंथ रूपात आले आहे. येत्या वर्षात ३ व पुढील वर्षी ३ तीन कांड ग्रंथ रूपात घरोघरी पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. इतर कांड यावीत यासाठी समाजाकडून पाठबळाची गरज आहे.
शरद कुबेर, अध्यक्ष, वाग्देवता मंदिर, धुळेⓂ
_____________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
_____________________________