बलात्कार का होतात? कसे थांबवावे? - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२४ एप्रिल २०२१

बलात्कार का होतात? कसे थांबवावे?

बलात्कार का होतात? कसे थांबवावे ? 


दि. २४ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3nhDLpp
काही वर्षात ज्या विषयांवर भारतात सर्वात जास्त चर्चा झाली असेल ते आहेत भ्रष्टाचार आणि स्त्रियांची सुरक्षितता व बलात्कार. भ्रष्टाचाराविरुद्ध देशव्यापी आंदोलन झालं, परिणाम स्वरूप लोकपाल कायदा मंजूर झाला (अजून अंमलबजावणी व्हायची आहे) आणि आम आदमी पार्टी हा पक्ष जन्मास आला. निर्भया बलात्काराच्या अमानवी घटनेनंतर बलात्कार आणि महिला सुरक्षेसंदर्भातील अनेक समस्यांबद्दल देखील मोठं आंदोलन झालं. चर्चा घडल्या. परंतु मोठे परिणाम घडवून आणू शकेल अश्या कुठल्या दीर्घ कालीन मोहिमेची सुरूवात झाली नाही.       

बलात्कार का होतात? कसे थांबवावे?
    

विविध विचारवंत, समाजसेवकह्या विषयावर कार्य करीत आहेतच. एकीकडे प्रबोधन घडवत रहाणे, दुसरीकडे महिला सुरक्षेच्या यंत्रणेवर कार्य करणे आणि तिसरीकडे समाजातील अनिष्ट घटकांना कठोरात कठोर शिक्षा होण्याची तरतूद कायद्यात करणे अश्या तीन अंगांनी भरपूर प्रयत्न सुरू आहेत. पण हे प्रयत्न विखुरलेले आहेत, त्यांची एकमूठ घडलेली नाही. आपलं बलात्काराच्या समस्येविषयी असलेलं निरनिराळं आकलन, हे ह्या प्रयत्नांच्या विखुरलेपणाचं कारण आहे.बलात्कार रोखण्यासाठी कुठले उपाय योजावेत ह्यावर चर्चा करताना काही ठराविक उपाय सुचवले जातात. अश्लील/प्रौढ मनोरंजनावर बंदी, वेश्या व्यवसाय अधिकृत करणे, बलात्काऱ्यास फाशीची (किंवाहात-पाय तोडणे वगैरे) शिक्षा, स्त्रियांची स्व-संरक्षण सिद्धता आणि संस्कारक्षम पिढी घडवणे हे पाच उपाय प्रामुख्याने सुचवले जातात.स्त्रीयांना संकटाचा सामना करण्याचं प्रशिक्षण देणे आवश्यक आहेच. परंतु ते पुरेसं नाही. शिवायभारतात मुलींचा शिक्षण आणि मैदानी खेळांतील सहभाग ह्या बाबतीतच अनंत अडचणी आहेत, तिथे सर्वांना डिफेन्स टॅक्टिक्स शिकवणं म्हणजे मोठं दिव्यच आहे.पॉर्न बंदी हा अनेकांना महत्वाचा उपाय वाटतो. अशी सेन्सॉरशिप योग्यकी अयोग्य हा वेगळा विषय आहे परंतु आपण केवळ बलात्कारासंदर्भात पॉर्न बंदी हा उपाय म्हणून जेव्हा बघू पहातो तेव्हा २ गोष्टींचा विचार करायला हवा – अमलबजावणीची शक्यता आणि कार्य-कारण संबंध.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट,जागतिक स्तरावरील अनेक वर्षांच्या अभ्यासानंतरदेखील पॉर्न आणि बलात्कारांचा संबंध स्पष्टपणे जोडता आलेला नाहीये. हेकाहींना धक्कादायक वाटेल – पण सत्य आहे.ह्या बाबतीत १९९१ सालचा एक अभ्याससमजून घेणं कदाचित मदत करू शकेल.अमेरिकेतील U.S. Commission on Obscenity and Pornography ह्यांच्या १९७० च्या रिपोर्टनुसार पॉर्न आणि बलात्काराचा संबंध अजिबात नव्हता. तरीपण १९९१ मधे काही behavioral scientists ने एक दीर्घ अभ्यास केला. अमेरिका, डेन्मार्क, स्वीडन आणि जर्मनीच्या काही भागात १९६४ ते १९८६ ह्या वीस वर्षांच्या कालखंडात झालेल्या बलात्कारांचे आकडे अभ्यासले गेले. हे चार देश निवडण्यामागचं कारण – तिथे ह्या वीस वर्षात पॉर्नची वाढत गेलेली उपलब्धता. बलात्कार आणि पॉर्नचा कार्य-कारण भाव आहे का हे तपासणे – हाच अभ्यासाचा हेतू होता.असे अभ्यास करताना इतर parameters देखील लक्षात घ्यावे लागतात. वरीलअभ्यास करताना असाच एक महत्वाचा parameter होता – बलात्कारेतर गुन्ह्यांची वाढ.अभ्यासांतार्गतअसलेल्या चारही देशांमध्ये १९६४-८६ ह्या २० वर्षात बलात्कारेतर गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळे, साहजिकच बलात्कारांमध्ये त्याच दराने वाढ होणे देखील स्वाभाविक होते. म्हणूनच – इतर गुन्ह्यांच्या तुलेनेने बलात्कारांमध्ये झालेली वाढ जर अधिक प्रमाणात असतील – तर आणि तरच पॉर्नचा संबंध सिद्ध करता आला असता.परंतु अभ्यासानंतर बलात्कारांमध्ये झालेली वाढ ही इतर गुन्ह्यांच्या वाढीच्या समप्रमाणात आढळली.हे संदर्भ कदाचित फार जुने वाटू शकतात. नवीन अभ्यास देखील वेगळं काही सांगत नाहीत.२००९ साली Christopher Ferguson आणि Richard Hartley ह्या मानस शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासाच्या conclusion मधे ते म्हणतात:It is time to discard the hypothesis that pornography contributes to increased sexual assault behavior.===पॉर्नमुळे लैंगिक अत्याचाराच्या कृतींमधे वाढ होते हे गृहीतक रद्द करण्याची वेळ आलेली आहे.इथेच आमची बलात्कारामागील मानसशास्त्र समजून घेण्यात होत असलेली गल्लत  लक्षात येते.
▪बलात्कारामागचं मानसशास्त्र
Sexual Assault and Abuse: Sociocultural Context of Prevention ह्या एका रिसर्च रिपोर्टमधे ShereHite ह्या सेक्स एज्युकेटर आणि स्त्रीवादी कार्यकर्त्यांचा संदर्भ आहे.Shere Hite ने एखादा पुरुष स्त्रीवर अत्याचार, बलात्कार का करतो ह्याचा अभ्यास करत असताना एकबलात्कारी पुरुष जे म्हणालाय ते सागितलंय:
मला बलात्कार का करावासा वाटतो? कारण मी एक पुरुष म्हणून एकहिंस्त्र शिकारी आहे आणि आम्हा पुरुषांसाठी सर्व स्त्रिया म्हणजे एक सावज असतं. मी जेव्हा एखादी स्त्री “ताब्यात” घेईन आणि तिच्या लक्षात येईल की आता तिची सुटका नाही – तेव्हा तिच्याचेहऱ्यावर जे असहाय भाव असतील, त्याची मी नेहेमी कल्पना करत असतो.
थोडक्यात – बहुतांश वेळा – केवळ उत्तेजना, वासना शमन करण्याची हिंसक प्रेरणा हे बलात्कारामागील कारण नसतं.बलात्कारामागे शारीरिक आणि मानसिक वर्चस्व प्रस्थापित करण्याची विकृत मानसिकता असते. एकूण बलात्कारांमधील काही घटना नक्कीच क्षणिक वासनांध भावनेने तोल ढळल्याने घडलेल्या असतात. पण बहुतांश बलात्कार हे अश्या विकृतीमुळे, थंड डोक्याने केलेले असतात.

ही विकृती वेश्यागमन अधिक सुलभ केल्याने आटोक्यात येणार नाहीये. कारण तिथे ‘सावज’ हेरल्याचं, विजय मिळवल्याचं समाधान मिळणार नाही.वरील विधानाचं गांभीर्य समजून घेण्यासाठी अधिक एक अभ्यास कामी येईल.एक – Self Reported Likelihood of Rape – हा रोचक अभ्यास आहे. ह्यात“मी कुठल्या परिस्थितीत बलात्कार करेन”– ह्या प्रश्नावर उत्तरं गोळा केल्या गेली.अभ्यासा अंती हे सिद्ध झालं की अनेक तरुण पॉर्न बघितल्यानंतर केवळ उत्तेजित होतात. हिंसक बलात्कार करण्याचे चिन्ह दाखवत नाहीत –पण – त्यांना जर हे माहितीअसेल की “they can get away with it” – म्हणजेच – त्यांनी बलात्कार करूनही त्यांना कुठलंही अनुशासन होणार नाही – तर ते बलात्कार करतील.वरील निष्कर्ष पुन्हा पुन्हा वाचायला आणि आमच्या डोक्यात घट्ट बसवून घ्यायला हवा –त्यांना जर हे माहिती असेल की “theycan get away with it” – म्हणजेच – त्यांनी बलात्कार करूनही त्यांना कुठलंही अनुशासन होणार नाही – तर ते बलात्कार करतील.इथेच ‘संस्कार’ हे उत्तर देखीलआवश्यक पण अपुरंठरतं. संस्कार हे केवळ घरी किंवा शाळा-कॉलेजमधे होतनसतात. सामाजिक संस्कार हे आजूबाजूच्या संपूर्ण परिस्थितीमुळे घडत असतात.गावगुंडांना राजरोस फिरताना बघून, प्रसिद्ध नेते-अभिनेते कितीही मोठा गुन्हा केलेला असला तरी चुटकीसरशी सुटलेले बघून नाठाळांवर कुठले संस्कार होतात हे कळणं अवघड नाही.अधून मधून उमटणारे “अंगभर कपडे घाला”, “वेळेत घरी या”…हे विचार देखील वरील निष्कर्ष चूक ठरवतो. बलात्कार हा मानसिक आणि शारीरिक वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या विकृत प्रेरणेचं आणि “मी ह्यातून सहज सुटू शकेन” अश्या विश्वासाचं फळ असतं.भारतात बलात्कारावरील उपायांवर केल्या जाणाऱ्या चर्चा ह्या विचारापर्यंत येत नाहीत. ते “बलात्काऱ्यास फाशी द्या”, “हात-पाय/गुप्तांग कापून टाका!” असं मागून थांबतात. परंतु अश्या कायद्यामुळे बलात्कार “थांबणार” नाहीत, ‘कठोर शिक्षा’ हे deterrent ठरू शकणार नाही, हे आमच्या लक्षात येत नाहीये.
▪शिक्षेची तीव्रता वाढायला नकोय, शिक्षेची हमी वाढायला हवीये.
आधी म्हटल्याप्रमाणे, कुठलाही विकृत मनुष्य एकदम बलात्कार करण्याची हिम्मत करत नाही. तो आधी मुलींना त्रास देतो, कुणाचा हात धरेल कुणावर शेरेबाजी करेल असे प्रकार घडतात. इतर छोटेमोठे गुन्हेही घडतात. त्यावेळी ह्या गुन्हेगारांवर अनुशासन होत नाही, मग त्यांची धिटाई वाढते. ‘मी कुठल्याही गुन्ह्यातून सुटू शकेन’ असा विश्वास बळावतो आणि मग बलात्कार होतात.
▪मूळ समस्या दोन आहेत.
➖पहिली – सामान्यांना शासनयंत्रणेत नगण्य महत्व असणं, ज्यामुळे ‘शहाण्याला’ कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची पायरी नकोशी झालीये. भारतीय लोकशाहीचा हा मोठाच पराभव आहे.
➖दुसरी अडचण आहे – गुन्हेगारांना शासनयंत्रणेत अनन्यसाधारण महत्व,ज्यामुळे एखादा हिम्मत करून पुढे गेलाच तर त्याचा श्रुती कुलकर्णी होतो. आम्हाला श्रुतीसारखा शेवट नको असतो म्हणून आम्ही गप्प बसतो, गप्पच रहातो आणि मग निर्भया घडतात, कोपर्डी आणि माळवाडी घडतं.म्हणून आधी आम्ही सर्वांनीच मुलींना, स्त्रीयांना मोकळे पणाने बोलण्यास उद्युक्त करणं आवश्यक आहे.पीडित व्यक्तीसच दोष देण्याची सवय हद्दपार करायला हवी.त्याच बरोबर शासन यंत्रणा अधिकाधिक जनताभिमुख करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. त्यासाठी कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेले पोलीस आणि ज्युडीशियल रिफॉर्म्स तातडीने अमलात आणणं अत्यंत आवश्यक आहे. सामान्य जनतेचा कायदा आणि सुव्यवस्थेतील सहभाग सध्या शून्य आहे, तो वाढवायला हवा – त्यासाठी तक्रार यंत्रणा अधिकाधिक पारदर्शक आणि गतिमान करायला हवी.अर्थातच सोबत, संस्कारक्षम समाज निर्मिती आहे स्वसंरक्षण सिद्धतेची अव्याहत प्रक्रिया देखील सुरू रहायलाच हवी. महत्वाचं म्हणजे हे सर्व सरकारशी भांडून नव्हे, समन्वयाने व्हायला पाहिजे. आधी म्हटल्याप्रमाणे, ह्यासाठी एक संयुक्तिक आणि सकारात्मक चळवळ उभी रहायला हवी. शासन-प्रशासन आणि जनता ह्यांनी आपला समाज सुरक्षित करण्यासाठी एकदिलाने झटायला हवं.निर्भया, कोपर्डी आणि माळवाडी घडल्यानंतर मोर्चा काढणे पुरेसे नाही. पुन्हा कोपर्डी/माळवाडी घडूच नये, ह्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498☜♡☞
🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🥇     
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂