टाचेचं दुखणं......
आपल्या टाचेच्या हाडापासून ते चवड्यापर्यंत एक जाडसर स्नायूचा पडदा ताणून बसविलेला असतो, त्यालाच प्लान्टर फेशिआ असे म्हणतात. या रचनेमुळे एखाद्या स्प्रिंग अथवा सस्पेन्शन सारखे काम या पडद्याकडून होते व आपल्या वजनाचा आपल्या पावलावर पडणारा भार हलका होण्यात मदत होते. खाच खळग्यातुन चालताना होणारी पावलाची वेडीवाकडी हालचालही या रचनेमुळे सुकर होते. असे असले, तरी त्या स्नायूच्या भार पेलण्याला काही मर्यादा आहेत. त्यावर नियमितपणे जास्त भार, दाब अथवा ताण पडत राहिला किंवा काही कारणाने त्याला इजा झाली तर या स्नायूच्या टाचेच्या बाजूच्या भागाला सूज येऊ लागते. यालाच वैद्यकीय भाषेत ‘प्लान्टर फेशिआयटीस’ असे म्हणतात.,या आजाराची लक्षणं म्हणजे टाचेत आणि तळव्याच्या मधल्या भागात वेदना जाणवतात. दुखण्यामुळे सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय टेकवताना त्रास होतो. जास्त वेळ बसून राहिल्यावर उठताना पंजा जमिनीवर टेकवताना टाच दुखते, मात्र थोडी पावलं चालल्यावर त्या वेदना कमी होतात.
📍कडक इन्सोलच्या बुटांमुळे किंवा सॅण्डल्समुळे पंजा आणि टाचा दुखतात. .
📍 फुटवेयरला व्यवस्थित हिल सपोर्ट नसल्यामुळे पंजा आणि टाचा दुखतात.
📍 उंच टाचेच्या चपला दीर्घकाळ वापरल्यामुळे पंजा आणि टाचा दुखतात.
📍 फ्लॅट फूट म्हणजे सपाट पाय असल्यास फेशिया सतत दुखावतो आणि टाच दुखते.
📍 पायाचे स्नायू टाइट असल्यामुळेही पंजा आणि टाचा दुखतात.
📍 ज्यांना सतत उभं राहून काम करावं लागतं. अशा लोकांमधे टाचेचं नॅचरल कुशन आकसलं जातं आणि भार सहन करण्याची क्षमता कमी होते.
📍जास्त वजन असणाऱ्या लोकांनाही हा आजार होण्याचा धोका असतो.
आतून हाड वाढायला सुरुवात होते आणि मग टाच अजून जास्त दुखायला लागते. जर अधूनमधून पायांचं दुखणं जाणवत असेल तर तुमचे पाय विशेषत: पंजे तपासून घ्या. त्यानुसार ट्रीटमेण्ट करा. शूजमधे योग्य ते बदल करा. उदा. शूजमधे वॅलगस पॅड किंवा मिडिअल वेज वापरल्यास दुखण्यात बराच फरक जाणवतो. ज्यांचे पाय सपाट असतात अशा लोकांना भविष्यात पायाचा आणि गुडघ्याचा त्रास होण्याची शक्यता असते. .
📍 जास्त वेळ उभं राहणं टाळा. त्रास जास्त असल्यास जॉगिंग, धावणं टाळा.
📍 शूजमधे हिल कप्स किंवा स्कूप्ड हिल्सचा वापर करा.
📍बेडवरून खाली उतरायच्या आधी पंजे वर-खाली करा. नंतर खाली उतरून बोटांवर उभा राहा. असं ८-१० वेळा करा. म्हणजे सकाळी पाय जमिनीवर नीट ठेवता येतील.
कुठलाही आजाराची वेळीच दखल घेतली, तर तो बरा होऊ शकतो. म्हणून दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका.