🌴 बाहेर नव्हे; घरात लावा झाडे आणि मग पाहा जादू! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०२ एप्रिल २०२१

🌴 बाहेर नव्हे; घरात लावा झाडे आणि मग पाहा जादू!

🌴 बाहेर नव्हे; घरात लावा झाडे आणि मग पाहा जादू !


दि. २ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक  http://bit.ly/3cIn4A1
🌴घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी भिंतींना चांगला रंग दिला जातो. सुंदर पडदे लावले जातात. डेकोरेशनच्या अनेक गोष्टी ठेवल्या जातात. पण या गोष्टींबरोबरच आणखी एक वस्तु आहे जी तुमच्या घराच्या केवळ सौंदर्यातच नव्हे तर मनाच्या प्रसन्नतेतही भर घालते. सर्वसाधारण लहान झाडे घराबाहेर, गच्चीत अथवा बाल्कनीमध्ये लावली जातात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची देखभाल करणे, त्यांना पाणी देणे सोईचे ठरते. पण ही लहान झाडे घराबाहेर लावणे जितके फायद्याचे असते त्यापेक्षा जास्त फायदे ती घरात लावल्यामुळे होतात

बाहेर नव्हे; घरात लावा झाडे आणि मग पाहा जादू

       
जर तुम्हीही अशी लहान झाडे घराबाहेर ठेवत असाल तर जाणून घ्या घरात अशी लहान झाडे लावण्याचे फायदे... 
     🌴  हवा शुद्ध होते
घरातील हवा शुद्ध करण्यासाठी आजकाल अनेक जण एअर प्रोरिफायरचा वापर करतात. बाहेरच्या प्रदुषणामुळे घरातील हवा देखील दुषित होते. पण यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे घरात छोटी-छोटी झाडे लावणे होय. ही झाडे तुमच्या घरातील कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण कमी करतात आणि तापमान कमी ठेवतात. त्याच बरोबर हवेत असलेले छोटे-छोटे कण देखील नष्ट करतात. या सर्व गोष्टींचाथेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. यामुळे हवेतून होणारे आजार कमी होतात आणि वारंवार आजारी पडण्याचे प्रमाण देखील बंद होऊ शकते. या झाडांमुळे तुम्ही पहिल्या पेक्षा अधिक अॅक्टिव्ह नक्कीच दिसाल.  
🌴 आवाजाचा त्रास कमी होतो
घराबाहेरील अनेक आवाज कितीही टाळले तरी तुमच्या कानावर येतातच. यामुळे अनेक वेळा घरातच मोठ्याने बोलावे लागते. घरातील ही लहान झाडे बाहेरच्या आवाजांना रोखतात.  झाडांमध्ये ध्वनी प्रदूषण रोखण्याची क्षमता असते. त्यामुळे घरात झाडे लावल्यामुळे शांती मिळते असे म्हणायला हरकत नाही.
🌴 तणाव कमी होतो
घरात झाडे लावण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्यातील तणाव कमी होतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे घरातील हवा शुद्ध राहते आणि बाहेरील आवाज देखील कमी होतो. या दोन्ही गोष्टींमुळे तुमचे मन शांत राहते आणि तणाव कमी होतो. मन शांत आणि तणाव विरहीत असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. हृदयाची कार्यक्षमता देखील चांगली राहते व थकवा जाणवत नाही. यासाठीच ऑफिस असो, घरातील हॉल, बेड रूम, स्टडी रूम येथे लहान झाडे लावणे फायदेशीर ठरते.
बाहेर नव्हे; घरात लावा झाडे आणि मग पाहा जादू

___________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🏉 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  ™ 🏉
______________________________