येथे महिलांना आहे आझादी, अन पुरुष बुरख्यात बंदिस्त. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२२ एप्रिल २०२१

येथे महिलांना आहे आझादी, अन पुरुष बुरख्यात बंदिस्त.

येथे महिलांना आहे आझादी, अन पुरुष बुरख्यात बंदिस्त. 


दि. २२ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3szHaRG
ट्वारेग हा एक प्रदेश आहे जेथे याच नावाची जमात राहते. लिबिया, अल्जेरीया देशाच्या दक्षिणेस अन माली देशाच्या सीमेस लागून, सहारा वाळवंटात या ट्वारेग जमातीतील लोक समूहाने राहतात. इस्लामिक धर्माचा अनुनय करणाऱ्या या जगावेगळ्या प्रदेशाची लोकसंख्या वीस लाख आसपास आहे पण आसपासच्याच नव्हे तर आपल्या सारख्या दूर दूरच्या देशांच्या कोटी कोटी लोकांना कुतूहल वाटेल असे त्यांचे वागणे आहे.

येथे महिलांना आहे आझादी, अन पुरुष बुरख्यात बंदिस्त.

▪पुरुषांना बुरख्याची सक्ती :
ट्वारेगमध्ये जरी पुरुष प्रधान संस्कृती असली तरी स्त्रियांसाठी असलेले त्यांचे विचार अन नियम हे जगावेगळे आहेत.           

त्यतीलच बुरख्याबाद्द्लचा त्यांचा नियम. येथे पुरुषांना चक्क बुरखा घालूनच फिरावे लागते. कोणीतरी वाटेल की वाळवंटात हे गरजेचे आहे तर ते तसे नाही कारण कोणतीही ट्वारेग मुलगी, स्त्री तुम्हाला बुरख्यात दिसणार नाही.
गम्मत म्हणजे याच बुरखाधारी ट्वारेग पुरुषांना “निळे पुरुष” असेही नाव पडले होते कारण “नीळ” मध्ये रंगवलेले बुरखे सतत घातल्यामुळे त्यांचे अंग निळ्या रंगात रंगले असायचे.
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट
प्रेमात मुलींना पूर्ण फ्रिडम :
महिला सबलीकरण, इक्वल राईट्सचा जगभर पुकार चालू असताना, भारतात ३३ टक्केतरी द्या अशी आळवणी होत असताना ट्वारेग मुली मात्र १०० टक्के फ्रिडम एन्जॉय करतात. अन तेही प्रेमासारख्या सेन्सिटिव्ह विषयात. ट्वारेग मुली लग्ना आधी कोणत्या, किती मुलांवर कधी अन कितीवेळा प्रेम करायचे हे स्वतः ठरवतात.
मुलींची घटस्फोटाची पार्टी :
ट्वारेग प्रदेशात मात्र सर्वच उलटे आहे. येथे लग्न मोडले तर नवरीच पार्टी करते. इतकेच नव्हे तर तिचे घरवाले देखील तिच्या या पार्टीत सहभागी होतात. तिला परत नवीन आयुष्य जगायला मिळणार म्हणून. अन हो तलाक द्यायचा का नाही हा निर्णयही बायकोच घेवू शकते.
जगभर घटस्फोट मिळाल्यावर स्त्री नवऱ्याकडून पोटगीची, पैशाची मागणी करते, तिला तिच्या भविष्यातील खर्चाबद्दल काळजी असते. पण ट्वारेग मध्ये असे काही होत नाही. घटस्फोटामुळे स्त्रीचे पैसे, मालमत्तेकडून काही नुकसान होत नाही. उलट नवऱ्याच्या संपप्तीवर मुलीचाच हक्क राहतो.
बहिणीची मुले वारसदार :
संपप्तीचे पूर्ण वारसदार ट्वारेग मुलगी असते हे तर बघितलेच. पण स्त्रीच्या मृत्यूनंतर तिच्या संप्पतीचा वारसदार हा तिचा नवरा वा मुलगा होत नाही तर तिच्या बहिणीकडे व बहिणीच्या मुलीकडे सारी संपप्ती जाते.
स्त्री सबलीकारणाचे निर्णय अन अंमलबजावणी पुरुषांनीच घेतली आहेत हे ट्वारेगचे आणखीन एक वैशिष्ठ.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🥇   
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂