गुजरातमधील रहस्यमय झुलणारी 🕌 मशीद. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२६ एप्रिल २०२१

गुजरातमधील रहस्यमय झुलणारी 🕌 मशीद.

गुजरातमधील रहस्यमय  झुलणारी  🕌 मशीद.  


दि. २६ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/2Pppef2
गुजरात राज्यात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. त्यापैकीच एक रहस्यमय इमारत जी अनेक मोठ्या वास्तू तज्ज्ञांसाठी न उलगडलेलं कोडं आहे. ती इमारत म्हणजे 'सीदी बशीर मशीद'. या मशिदीत असलेले एक मिनार हलवल्यास दुसरे मिनारही आपोपापच हलायला लागते. यामुळेच या मशिदीचे नाव झुलता मिनार ठेवण्यात आले आहे.              

विशेष म्हणजे अनेकवेळा भूकंप होऊनही या मशिदीवर त्याचा काहीच प्रभाव पडला नाही. संशोधकांसाठी हीएक आश्चर्याची गोष्ट आहे. गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे ही मशीद आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट,जगातील सर्व इंजिनीअर आणि आर्किटेक्ट या झुलत्या मिनारी मागचे कारण शोधून काढण्यात अपयशी ठरले आहेत. या मशिदीचे रहस्य जाणण्यासाठी ब्रिटीश शासनाने त्याकाळात ब्रिटनहून इंजिनीअर बोलावलेहोते. ज्यांनी या मशिदीचे खणनही केले, पण तरीही त्यांना यामागचे कारण काही कळले नाही.
🕌 मशिदीचा इतिहास 🕌
सीदी बशीर मशिदीचे बांधकाम १४६१ ते१४६४ दरम्यान सारंगने सारंगपूर येथे केले होते. मशिदीच्या बांधकामाची सर्व सुत्रे सीदी बशीर यांच्याकडे होती. त्यांच्या मृत्यूनंतर याच मशिदीजवळ त्यांना दफन करण्यात आले. त्यावरुन या मशिदीचे नाव सीदी बशीर मशीद असे पडले.

गुजरातमधील रहस्यमय  झुलणारी  🕌 मशीद.

🕌 काय आहे रहस्य? 🕌
ही झुलणारी मिनार नकळत तशाप्रकारे बनली गेली आहे. ज्या दगडांचा वापर करुन ही मशीद उभारण्यात आली, ते वेगळ्या प्रकारचे दगड होते, असे मत संशोधकांनी मांडले आहे.दुसऱ्या एका शोधात असे सांगितले गेले आहे, की ज्या दगडांनी या मशिदीचे निर्माण केले, त्यात फेलस्पारची मात्रा अधिक होती. अनेकवर्षांच्या रासायनिक अभिक्रियेनंतर दगडांवर हा परिणाम झाला आहे. फेलस्पार या पदार्थाचे हळू हळू अॅसिडमध्ये रुपांतर होते. परिणामी, हा दगड लवचीक होऊन दगडांमध्ये मोकळी जागा निर्माण होते. या दगडांना मिनार बलुआ असे म्हणतात. या दगडांमध्येच अशा प्रकारचे गुण असल्याचे संशोधक सांगतात.आता यात नेमकं खरे काय आणि खोटे काय, ते सांगता येणार नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🥇   
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂