हे मंदिर देते पावसाचे संकेत ! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


३० एप्रिल २०२१

हे मंदिर देते पावसाचे संकेत !

 हे मंदिर  देते पावसाचे संकेत !  


दि. ३० एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3u77rsd
 कानपूरच्या जनपथमधील जगन्नाथ देवांचे मंदिर! जे एका अनोख्या विशेष कारणासाठी प्रसिद्ध आहे. ह्या मंदिराचे वेगळेपण असे आहे की, हे मंदिर पाऊसयेण्याची सूचना ७ दिवस आधीच देते.तुमचा यावर सहजासहजी विश्वास बसणार नाही, पण ही अगदी खरी गोष्ट आहे!              

जगन्नाथ देवांचे हे मंदिर कानपूर मधील जनपथच्या भीतरगाव विकासखंड मुख्यालय पासून तीन किलोमीटरवर बेंहटा गावात आहे. असे म्हटले जाते की, ह्या मंदिराचे हे वैशिष्ट्य आहे, की पाऊस येण्याच्या ७ दिवस अगोदर ह्याच्या छतावरून पावसाचे काही थेंब आपोआप पडायला सुरवात होते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट, हे रहस्य जाणून घेण्यासाठी खूप वेळा प्रयत्न करण्यात आले आहेत. पण या मंदिराचे रहस्य पुरातत्व खात्यालाही उलगडता आलेले नाही.एवढंच नाही, माहित पडले आहे की, मंदिराचा शेवटचा जीर्णोद्धार ११ व्या शतकात झाला होता. त्याच्या आधी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार कधी झाला होता हे अजूनही माहित झालेले नाही. पाऊस येण्याची माहिती आधीच समजत असल्याने येथील शेतकऱ्यांना मात्र खूप फायदा होतो.
ह्या मंदिरात भगवान जगन्नाथ,बलदेव आणि बहिण सुभद्रा यांच्या काळ्या दगडाच्या मूर्ती स्थापन आहेत. तसेच सूर्य आणि पद्मनाभम देवांच्या मूर्ती देखील आहेत.मंदिराच्या भिंती १४ फुट रुंद आहेत. सध्या हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे. या मंदिरातून तशीच रथयात्रा निघते जशी पुरी उडीसा मधील जगन्नाथ देवांच्या मंदिरातून निघते.मान्सूनचा पाऊस येण्याच्या एक आठवड्यापूर्वी ह्या मंदिराच्या गर्भ ग्रहच्या छतातून मान्सूनी दगडातून घनत्वाकारचे थेंब पडतात, जश्या प्रकारचा पाऊस पडणार आहे अगदी तसे. जसा पाऊस सुरु होतो तसा हा दगड सुकून जातो.

हे मंदिर  देते पावसाचे संकेत

मंदिराचा आकार बौद्ध मठाप्रमाणे आहे. त्यामुळे लोक मानतात की, हे मंदिर सम्राट अशोकाने बनवले असेल,परंतु मंदिराच्या बाहेर असलेल्या मोर आणि चक्र यांच्या आकृती वरून काही लोकांना वाटते किह्या मंदिराचे निर्माण सम्राट हर्षवर्धन यांच्या काळात झाले असावे.कधी कानपूरला भेट दिलीत तर नक्कीचया मंदिराचे दर्शन घ्या!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🥇   
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂