भोराईच्या किल्ल्यावर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२९ एप्रिल २०२१

भोराईच्या किल्ल्यावर

 भोराईच्या किल्ल्यावर


फेसबुक लिंक http://bit.ly/3eDASLZ
सुधागड (जि. रायगड) हा किल्ला फार प्राचीन आहे. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली.

भोराईच्या किल्ल्यावर,On the fort of Bhorai

सह्यादीतल्या किल्ल्यांमध्ये 'सुधागड' आपलं स्वतंत्र अस्तित्व आणि ओळख समर्थपणे टिकवून आहे. फार कमी जणांना हा ऐतिहासिक आणि भौगोलिक संदर्भ माहीत आहे. मराठ्यांच्या राजधानीच्या ठिकाणासाठी महाराजांनी जवळजवळ हे ठिकाण निश्चित केलं होतं. गडावरची विस्तृत सपाटी हे त्यातलं महत्त्वाचं कारण असावं. त्यादृष्टीने त्यावेळच्या प्रमुख विचारवंतांनी या परिसराची कसून पाहणीही केली होती. पण शेवटी निवड झाली ती रायगडाची. त्यावेळची मोगलांबरोबरच्या झगड्याची व्याप्ती लक्षात घेतली तर या ठिकाणचा राजधानी म्हणून केलेला विचारच या ठिकाणाची भौगोलिक समर्थता दाखवतो.
महाराजांच्या अमदानीत १६४८ मध्ये हा किल्ला नारो अप्पाजी यांनी मुघलांकडून जिंकून स्वराज्यात आणला.
या किल्ल्याला आणखी एक ऐतिहासिक संदर्भ आहे. औरंगजेबाच्या मुलाने, शाहजादा अकबरने, बापाशी म्हणजे औरंगजेबाशी फारकत घेऊन मोगलांची छावणी सोडली आणि तो मराठ्यांना येऊन मिळाला. त्यावेळी त्याने याच परिसराचा आसरा घेतला होता. त्याने या गडाच्या धोंडसे आणि नाडसूर परिसरात दीर्घकाळ आपली छावणी टाकली होती. हा परिसर सह्यादीच्या ऐन गाभ्यातला आहे. त्यावेळी त्याच्याबरोबर त्याचे विश्वासू मिर्झा यहुद्दीन शुजाई, वकील अब्दुल हमीद आणि दुर्गादास राठोड अशी मोगलांच्या बाजूची नामवंत मंडळी होती. ही घटना संभाजीराजांच्या काळातली आहे आणि ही घडामोड या प्रदेशाचं बेलागपण ठसठशीतपणे दाखवते.गडाच्या पायथ्याशी असलेल्या 'पाच्छापूर' या गावातच छत्रपती संभाजी राजे व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती.Ⓜ
या जागेचं आणखी एक महत्त्व म्हणजे भोर संस्थानच्या पंत सचिवांच्या कुलदेवतेचं, भोराईदेवी. इथे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मोठी जत्रा भरते. त्यामुळे या किल्ल्याला 'भोराईचा किल्ला' असंही म्हटलं जातं. काही ठिकाणी या किल्ल्याचा उल्लेख 'घेरा सुधागड' असाही करण्यात आला आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,सुधागडच्या डोंगराचा घेर प्रचंड असल्याने पायथ्याचा परिसरही विस्तृत आहे. पायथ्याला नाडसूर, धोंडसे आणि वैतागवाडी अशी तीन गावं आहेत. यातल्या कुठल्याही गावातून गडावर जाता येत असलं तरी वैतागवाडीहून गडाच्या मुख्य वाटेला जाणारी पायवाट बऱ्यापैकी सोयीची आहे. पहिल्या अर्ध्या तासाची सपाटीवरची चाल सोडली तर गडापर्यंत जाणारी वाट गर्द रानातून जाते. मधला अर्ध्याएक तासाचा टप्पा प्रचंड दगडधोंड्यांचा आहे. साधारण पाऊण टप्पा पार केला की वाटेच्या बाजूलाच डावीकडे पाण्याची टाकी आहे. इथे कातळात कोरलेली 'बहिरोबा'ची प्रतिमा आहे.
गडावर रमतगमत जायला अडीच ते तीन तास लागतात. सगळा चढ अजिबात अंगावर येणारा नाही. गडाच्या सगळ्या उतारांवर प्रचंड रान असून यात भेकरं, कोल्हे, माकडं आणि तुरळक प्रमाणात अस्वलंही आहेत.
गडावर प्रचंड मोठी सपाटी असून या सपाटीवर मध्येमध्ये दाट जंगलाचे पुंजके आहेत. गडमाथ्यावर मोकळ्या जागेत भोराईदेवीचं चांगलंच मोठं आणि बऱ्यापैकी स्थितीत असलेलं देऊळ आहे. देवळाच्या गाभाऱ्याबाहेरच्या मंडपात पंचवीसेक जण सहज मुक्काम करू शकतात. बाहेरच्या पटांगणात शेकोटीभोवती बसून मोकळ्या वाऱ्यात गप्पाही मारता येतात. देवळापासून पाच मिनिटं चालत जाण्याच्या अंतरावर पण गर्द झाडीत पंतप्रतिनिधींचा त्यावेळी बांधलेला मोठा वाडा आहे. आता हा वाडा पडक्या स्थितीत असला तरी त्याच्या ओसरीत पंचवीसेक जण सहज राहू शकतात. वाड्याला मोठं कूस असल्याने सुरक्षितही वाटतं. या दोन्ही ठिकाणांपासून पाच ते दहा मिनिटांवर एक मोठं तळं आहे. पण इथलं पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे इथे मुक्काम करायचा असल्यास सोबत पिण्याच्या पाण्याचा भरपूर साठा हवाच.Ⓜ

गडाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे भरपूर प्रमाणावर साप आहेत. इतके की इथे परंपरेने 'अजिबात नांगरट करायची नाही', असा जणू अलिखित नियमच आहे. जो इथे नांगरट करेल त्याचा निर्वंश होईल, असा इथल्या स्थानिकांचा समज आहे. त्यामुळे रात्रीच्या शेकोटीसाठी किंवा जेवणासाठीचा लाकूडफाटा दिवसाच्या उजेडातच करावा. मुक्कामाच्या जागेची, त्यातही कोपऱ्यांची काटेकोरपणे तपासणी करून मगच तिथे राहावं.Ⓜ
नाडसूरला जाण्यासाठी ठाण्याहून सकाळी थेट बस आहे. याव्यतिरिक्त पालीहून बसने किंवा सहा आसनी रिक्षाने जाता येतं. गडावर लोणावळा-आंबवणे, तैलबैला करत 'वझरी'च्या खिंडीतून नाडसूर गाठता येतं. तसं मुळशी-पवना खोऱ्यातल्या जंगलातूनही हा परिसर गाठता येतो. मागतले इथले काही विस्तृत प्रदेश आजही निर्जन असल्याने अत्यंत माहितगार असणारा स्थानिक सोबत असणं आवश्यक आहे.आणखी एक आठवण म्हणजे,महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी छत्रपती संभाजी राजांनी सुधागड परिसरात असणार्‍या परली गावात हत्तीच्या पायी दिले होते

_____________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
_____________________________

On the fort of Bhorai

_______________________________
mahiti seva Group Pethwadgaon
_______________________________

Sudhagad (Dist. Raigad) This fort is very ancient. The Thanale Caves, which exist in this area, are 2200 years old. This suggests that Sudhagad must have been an equally old fort. There are many mentions in the Puranas that Bhrigu sages lived here. It was these sages who established Goddess Bhorai on this hill.


In the forts of Sahyadi, 'Sudhagad' has maintained its independent existence and identity. Very few people know this historical and geographical context. The Maharaja had almost fixed this place as the capital of the Marathas. The wide surface of the fort should be the main reason. In view of this, the leading thinkers of that time had also thoroughly inspected this area. But in the end, Raigad was chosen. Considering the extent of the conflict with the Mughals at that time, the idea of ​​this place as the capital shows the geographical potential of this place.
In 1648, this fort was conquered by Naro Appaji from the Mughals and brought under Swarajya.
This fort has another historical context. Aurangzeb's son, Prince Akbar, parted ways with his father, Aurangzeb, and left the Mughal camp, and the Marathas came and got it. At that time, he had taken refuge in this area. He had encamped for a long time in the Dhondse and Nadsur areas of the fort. This area is in the heart of Sahyadi. At that time, he was accompanied by his confidants Mirza Yahuddin Shujai, Vakil Abdul Hameed and Durgadas Rathod. This incident dates back to the time of Sambhaji Raja and this incident clearly shows the beauty of this region.
Another significance of this place is the deity of the Pant Secretary of Bhor Sansthan, Bhoraidevi. Here Ashwin fills a big fair from pure pratipada to dashami. Therefore, this fort is also called 'Bhoraicha fort'. In some places, this fort is also referred to as 'Ghera Sudhagad'. You are reading the post of Information Service Group Pethwadgaon. There are three villages at the foothills, Nadsur, Dhondse and Vaitagwadi. Although you can reach the fort from any of these villages, the footpath leading from Vaitagwadi to the main road of the fort is very convenient. If you leave the surface for the first half hour, the path to the fort passes through the dense forest. The half-hour stage in the middle is of huge boulders. There is a water tank on the left side of the road. Here is an image of 'Bahiroba' carved in the rock.
It takes two and a half to three hours to reach the fort. Not all variations occur at all. There are huge forests on all the slopes of the fort and there are beggars, foxes, monkeys and rare bears.
The fort has a huge surface with dense forest clusters in the middle. In the open space on the top of the fort, there is a large and well-preserved temple of Bhoraidevi. Twenty-five people can easily stay in the tent outside the temple premises. You can sit around the fire in the outdoor patio and chat in the open air. At a distance of five minutes walk from the temple, but in the thicket, there is a big palace of the Prime Minister built at that time. Even though the castle is now in a dilapidated condition, it can easily accommodate 25 people. The castle also feels safe as it has a large couch. There is a large pond five to ten minutes from both these places. But the water here is not drinkable. So if you want to stay here, you need to have plenty of drinking water
Another feature of the fort is the abundance of snakes. So much so that there is a tradition of 'don't plow at all', as if it is an unwritten rule. The locals believe that anyone who plows here will perish. Therefore, firewood for night fires or meals should be cut in broad daylight. Strictly inspect the place of stay, even the corners in it and then stay there
There is a direct bus from Thane to Nadsur in the morning. In addition, buses or six-seater rickshaws can be used from Pali. Nadsur can be reached through the gorge of 'Wazari' by fermenting and oiling the fort. The area can also be reached through the forests of Mulshi-Pavana valley. As some of the vast areas here are still desolate, it is necessary to have a very knowledgeable local companion. Elephant feet were given to Parli village in the area
_______________________________
mahiti seva Group Pethwadgaon
__________________________