चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२८ एप्रिल २०२१

चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे निधन


सर्वसामान्यांसाठी झटणारे एक अनुभवी, निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड : खासदार बाळू धानोरकर


चंद्रपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष तथा चंद्रपूरचे माजी पालकमंत्री एकनाथजी गायकवाड यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक असून सर्वसामान्यांसाठी झटणारे एक अनुभवी आणि निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षातील अनुभवी व लोकांच्या हितासाठी झटणारे नेतृत्व आज हरपले आहे. या कठीण प्रसंगी त्यांच्या कन्या आणि राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड आणि संपूर्ण गायकवाड कुटुंबाप्रती माझा संवेदना आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धर्मनिरपेक्ष विचारांची पाठराखण करणारा एक जेष्ठ नेता काळाच्या पडद्याआड :- आमदार प्रतिभाताई धानोरकर चंद्रपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माझी विधानसभेतील सहकारी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील माजी चंद्रपूरचे पालकमंत्री एकनाथ गायकवाड यांचे निधन झाले. मुंबईतील अतिशय लोकप्रिय नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांच्या निधनामुळे धर्मनिरपेक्ष विचारांची पाठराखण करणारा एक ज्येष्ठ नेता काळाच्या पडद्याआड गेला.
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी विधानसभा क्षेत्रातून त्यांनी आमदार म्हणून काम केले. मुंबई येथील असून देखील त्यांनी चंद्रपूर चे पालकमंत्री म्हणून काम केले. त्यांच्या सहवास मला लाभला नाही. यांची नेहमी खंत राहील परंतु त्यांची मुलगी माझी विधानसभेतील सहकारी शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याशी काम करण्याच्या योग्य आले आहे. या दुःखद प्रसंगी आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.