स्वर्गात जागा बुक करणारा भन्नाट व्यवसाय ! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०८ एप्रिल २०२१

स्वर्गात जागा बुक करणारा भन्नाट व्यवसाय !

🔸 अजब गजब व्यवसाय 🔸

 स्वर्गात जागा बुक करणारा भन्नाट व्यवसाय ! 


दि. ८ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3dKzOVT
कोणाच्या डोक्यात कधी काय खूळ येईल, याचा काही नेम नाही. उद्योग-व्यवसायाच्या अशा काही भन्नाट आयडिया लढवल्या जातात, की त्यांचे काम पाहून तोंडात बोटे घालावी लागतात. पैसे कमवण्यासाठी लोक वाट्टेल ते व्यवसाय शोधून काढतात. कोणी कोंबडी पालन करायला शिकवतेय तर कोणी स्वर्गात जागा मिळवून देणारी वेबसाईट चालवते. हे ऐकूण तुम्ही म्हणाल ‘असा कुठे व्यवसाय असतो का?’. पण, होय लोक असे व्यवसाय करतात आणि त्यातून नफाही मिळवतात. सामान्यांच्या डोक्यात कधीच न येणाऱ्या आणि प्रत्येक उद्योजकाला चकीत करणाऱ्या परदेशातील काही कल्पनांबद्दल जाणून घेऊयात...   

स्वर्गात जागा बुक करणारा भन्नाट व्यवसाय !
        

🔹स्वर्गात जागा बुक करायचीय ?
जगभरात लोक स्वर्ग आणि नरक या कल्पनांवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. परदेशात मात्र, स्वर्गात जागा बुक करण्यासाठी एक वेबसाईट चालवली जाते. या वेबसाईटचा पत्ता reserveaspotinheaven.comअसा आहे. या पत्यावर येऊन लोक १५ डॉलर देऊन स्वर्गातील जागा बुक करतात.येथे जाऊन जागा बुक केल्यास ग्राहकाला जागा निश्चितीकरण प्रमाणपत्र, आयडी कार्ड आणि जागेपर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करणारे पुस्तक दिले जाते. एक उद्योजक म्हणून विचार केल्यास मेल्यानंतर जर एखाद्याला त्याची निश्चित जागा मिळाली नाही तर तो पैसे मागायला परत येणार नाही त्यामुळे हा व्यवसाय तिकडे फायद्यात सुरू आहे.
▪बॉयफ्रेंड बॉडी पिलो  ▪
ज्या लोकांना त्यांच्या साथीदाराच्या कुशीत झोपण्याची सवय असते त्यांच्यासाठी ‘बॉयफ्रेंड बॉडी पिलो’ची ऑनलाईन विक्री केली जात आहे. या उशीसोबत झोपल्यानंतर तुम्हाला एखाद्याच्या कुशीत झोपल्याचाफिल येईल. ही उशी ॲमेझॉनवरही उपलब्ध आहे.
♦पोटॅटो पार्सल  ♦
व्हॉट्स ॲप आणि फेसबुकच्या ऑनलाईन जमान्यात पत्रलेखन मागे पडले असले तरी लोक बटाट्यावर संदेश लिहून एकमेकांना पाठवतात, होय हे खरेआहे. असे संदेश लिहिलेले बटाटेएकमेकांना पोहोचवण्याचे काम एक कंपनी करत आहे. पोटॅटो पार्सल नावाची एक कंपनी ऑनलाईन ऑर्डर घेऊन लोकांपर्यंत बटाटे पोहोचवत आहे. या बटाट्यावरील संदेश किती आकाराचा आहे त्यावर त्याचे भाडे ठरलेले असते.
माहिती सेवा ग्रूप
🔸कोंबडी पालन शिकायचेय ? 🔸
तु्हाला चिकन खायला प्रचंड आवडते. पण, बाजारातून चिकन खरेदी करून खायचे नसेल आणि तुम्हाला कुकुटपालनही येत नसेल तर तुमच्यासाठी एका कंपनीने खास व्यवस्था केली आहे. ‘रेंट अ चिकन’ नावाची एक कंपनी आहे जी तुम्हाला कोंबडीही देते आणि तिचे पालन कसे करायचे हे शिकवणारी एक व्यक्तीही देते. ती व्यक्ती कोंबडी पालन शिकवते त्यात जर तुम्ही परफेक्ट झालात तर ही कंपनी सेवा बंद करते. त्यानंतरतुम्ही स्वत: कोंबडीपालन करू शकता.
🔹मोडतोड करा आणि पैसे द्या 🔹
एखाद्याला राग आला तर तो प्रचंड आदळाआपट करतो. मोडतोड करतो यामुळे सामानाचे नुकसान होते. हेच होऊ नये यासाठी एक कंपनी तुम्हाला सेवा पुरवते. तुम्हाला राग आल्यास संबधित कंपनीच्या स्टोअर रूममध्ये जायचे आणि मोडतोड करायची. या मोडतोडीचे तुम्हला पैसे द्यावे लागतील.
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜♡☞
🔵 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  🔵
______________________________