सामाजिक संस्था,अनामप्रेम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२४ एप्रिल २०२१

सामाजिक संस्था,अनामप्रेम

सेवाभावी संस्था

अनामप्रेम
____________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
____________________________

फेसबुक लिंक http://bit.ly/3vf6OwB
मागील काही वर्षात आपल्या समाजात विविध विषयांची बरीच जनजागृती होत आहे. अनेक संस्था, प्रतिष्ठान आपापल्या परीने समाजासाठी आपापले योगदान देत आहेत. याचा अभिमान नक्कीच आहे. नावे आणि कार्ये जरी वेगवेगळी असली, तरी त्यांचा अंतिम उद्देश समाजासाठी काही भरीव कार्य करणे हाच असतो. आजही अनेक संस्था अशा आहेत ज्यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचत नाही. या संस्थांचे कार्य सर्वत्र पोहोचवता यावे, त्यांच्या कार्याची माहिती सर्वांना मिळावी म्हणुन माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव आपणास काही सामाजिक संस्था व त्यांच्या कार्याची माहिती देत आहे
संस्थेचे नाव: अनामप्रेम
नोंदणी क्रमांक: महा./६५/०६/अ. नगर
पत्ता: अनामप्रेम भवन, गांधी मैदानाजवळ, अहमदनग

संस्थेचे कार्य:
००५ मधे काही उत्साही तरूणांनी एकत्र येऊन अनामप्रेम या संस्थेची स्थापना केली. ही संस्था मुख्यतः अपंग, अंध व मूक-बधीर तरूणांसाठी काम करते. या संस्थेला सरकारी अनुदान मिळत नसून आपल्यासारख्या देणगीदारांच्या मदतीवरच संस्थेचे वेगवेगळे उपक्रम चालू असतात. संस्था रजिस्टर्ड असून संस्थेला दिलेल्या डोनेशनला: ८० जी खाली सवलत आहे.
संस्था सध्या चालवत असलेले उपक्रमः
प्रकाशवाटा: अंध मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीतून त्यांना नोकरीसाठी सक्षम बनवण्यासाठी काढण्यात येणारे मराठी ब्रेल भाषेतील एक अद्वितीय मासिक
कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर
इंग्रजी बोलण्याचा वर्ग
हिंमत भवनः ८० मुलामुलींसाठीचे शेल्टर होम
आधारः अंध व अपंगांना दैनंदिन जीवनातील समस्यांवर मात करून स्वावलंबी बनवण्यासाठीचा उपक्रम
हेलन केलर लायब्ररी: ब्रेल पुस्तकांची लायब्ररी
प्रकाशगानः अनामप्रेम येथील तरूणांचा ऑर्केस्ट्रा
मंगल बंधन: अंध, अपंग व मूक-बधीर यांच्यासाठी चालवले जाणारे विवाह जुळवणी केंद्र या तरूणांनी कायम देणगीदारांवर अवलंबून रहाण्यापेक्षा त्यांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन स्वतंत्र व आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. त्यासाठी वरील उपक्रमांच्या जोडीने संस्था 'व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर' सुरू करत आहे.


हे ट्रेनिंग सेंटर' २.५ एकर जागेत बांधले जात असून एप्रिल महिन्यापासून बॅचेस चालू करायचा त्यांचा मानस आहे.
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
आताची गरज:
१. 'व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर' च्या बांधकामाच्या निधीसाठी मदत
२. १५ कॉम्प्युटर्स
३. ५० प्लॅस्टिक खुर्च्या
४. प्रिंटर/स्कॅनर/कॉपिअर
सामाजिक उपक्रमाच्या निधीनुसार संस्थेच्या प्राधान्याप्रमाणे वरीलपैकी एका कार्यासाठी निधीचा सदुपयोग करण्यात येईल.
संपर्क:
१. अजित माने
क्रमांक:+91- 7350013801
२. अजित कुलकर्णी
क्रमांक:- +91- 7350013805 / +91-9011020174,
इमेल:- [email protected]