✈ विमानांना पांढरा रंग का दिलेला असतो ? - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०७ एप्रिल २०२१

✈ विमानांना पांढरा रंग का दिलेला असतो ?

  विमानांना पांढरा रंग का दिलेला असतो ? 


दि.७ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/31RzKOD
विमाने नेहमी पांढऱ्या रंगाचीच का असतात? विमानसेवा देणारी कंपनी इतर सर्व गोष्टींवर बराच खर्च करते. तर मग आपल्या विमानांना रंगीत आणि अधिक आकर्षक का बनवत नाही?प्रवासी आणि माल वाहतूक करणारी विमाने ही पांढऱ्या रंगाची असतात. अशी खूप कमी विमाने असतात जी विविधरंगी किंवा रंगीबेरंगी असतात.सर्वात महत्वाचे कारण म्हणजे पांढरा रंग हा सूर्याच्या प्रकाशाला सर्वात चांगल्या प्रकारे परावर्तीत करू शकतो.


विमानांना पांढरा रंग का दिलेला असतो?

इतर गडद रंग असं करू शकत नाहीत. काळा किंवा इतर कुठलाही गडद रंग सूर्यप्रकाश परावर्तित करत नाहीत. परावर्तित होण्याचे प्रमाण फारच कमी असते.विमाने आकाशात उडतात व त्यांच्यावर सूर्याच्या उष्णतेचा थेट परिणाम होत असतो.विमान जेवढे सूर्याच्या उष्णतेमुळे तापेल तेवढे ते विमानातील प्रवासी आणि विमानाच्या बाह्य व अंतर्भागातील छोटे मोठे पार्ट्स यांच्यासाठी नुकसानकारक असते.

विमानांना पांढरा रंग का दिलेला असतो ?

  
✈यामुळे विमानाला पांढरा रंग दिला जातो जेणेकरून पांढर्या रंगामुळे सूर्याची उष्णता परावर्तित होईल व विमान सूर्यकिरणांमुळे बाहेरून तापणार नाही.
पांढऱ्या रंगामुळे विमानात झालेली खराबी म्हणजेच तेल किंवा ऑइल लिकेज लवकर कळतात. दररोज विमान उन्हामध्ये उभे असल्यास त्याच्यावर लावलेले इतर रंग फिकट होतात. मात्र पांढर्‍या रंगासोबत अशी समस्या निर्माण होत नाही. याशिवाय विमानाला रंग देण्यासाठी साधारणत: ३ लाख ते १ कोटी रुपये इतका खर्च येतो. हेच जर वेगळा रंग द्यायचा म्हटल्यास ही किंमत आणखी वाढेल त्यामुळे कंपन्या पांढराच रंग देतात.
पांढर्‍या रंगाचे स्वतःचे भौतिक वैशिष्ट्य आहे. या रंगामुळे प्रकाशाची उष्णता कमी होते. म्हणूनच मोकळे आकाशात एखाद्या विमानात बसलेल्या प्रवाशाला थंडी वाटते. विशेषतः नंतर

जेव्हा विमान सूर्यप्रकाशात उभा असेल आणि वातानुकूलित आणि एअर कंडिशनिंग नसेल. पांढर्‍या रंगाव्यतिरिक्त, इतर रंगाच्या विमानाला अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतात. ज्यामुळे ते पांढर्‍या रंगापेक्षा अधिक महाग होते. म्हणून पांढर्‍या रंगाचे विमान देखील पैशाची बचत दर्शवते. पांढऱ्या रंगाचा कंपनीला अतिरिक्त फायदा आहे.
तसेच जर कधी कुठले विमान दुर्घटनाग्रस्त झाले, तर त्याच्या पांढऱ्या रंगामुळे ते समुद्र, जंगल किंवा जमिनीवर स्पष्टपणे दिसू शकते. रात्रीच्या काळोखात देखील पांढऱ्या विमानाला बघणे सहज सोपे आहे.म्हणुन जास्ती जास्त विमाने पांढऱ्या रंगाची असतात.

______________________________